सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गणेशोत्सवानिमित्त हार्दिक जोशीची स्पेशल पोस्ट, बाप्पाचा फोटो शेअर करत म्हणाला, “बायकोचा पहिला…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 21, 2023 | 9:07 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Hardeek Joshi On Ganeshotsav

गणेशोत्सवानिमित्त हार्दिक जोशीची स्पेशल पोस्ट, बाप्पाचा फोटो शेअर करत म्हणाला, "बायकोचा पहिला…"

सध्या सर्वत्र गणेशोत्सवानिमित्त एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय. सर्वसामान्यांपासून ते अगदी कलाकार मंडळींपर्यंत सगळ्यांकडेच गणेशोत्सवाचा आनंद पाहायला मिळतोय. बऱ्याच नवोदित कलाकार जोडप्यांचा यंदाचा पहिला गणपती आहे. बऱ्याच कलाकारांनी त्यांच्या घरच्या गणपती बाप्पांचे अनेक फोटोस, व्हिडीओस शेअर देखील केले आहेत. गणेशोत्सवाचा हा आनंद एका कलाकार जोडप्याने देखील शेअर केला आहे. (Hardeek Joshi On Ganeshotsav)

मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध जोडी म्हणजे अभिनेता हार्दिक जोशी व अभिनेत्री अक्षया देवधर. ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतून ही जोडी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. या जोडप्याने मालिकेत उत्तम अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रेक्षकांना ही जोडी ऑनस्क्रीन जेवढी आवडली तितकीच ती ऑफस्क्रीनही लोकप्रिय ठरली. या जोडीचा वेगळा असा चाहतावर्ग आहे. मालिका संपल्यानंतर या दोघांनी एकमेकांसोबत संपूर्ण आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला.

आणखी वाचा – Video : ढोल, ताशे, पारंपारिक अंदाज अन् परदेश दौरा…, परदेश दौऱ्यादरम्यान अमृता देशमुखने घेतलं बाप्पाचं दर्शन, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “नट्टा-पट्टा…”

लग्नानंतर हार्दिक व अक्षयाचे पहिले सर्वच सण ही जोडी आनंदाने साजरी केली आहे. काही दिवसांपूर्वी अक्षयाची लग्नानंतरची पहिलीच मंगळागौर साजरी करण्यात आली. त्यानिमित्त हार्दिकच्या घरी जोरदार तयारीही करण्यात आली होती. अक्षयाने तिच्या पहिल्या मंगळागौरचे फोटो सोशल मीडियावर शेअर देखील केले होते, अक्षयाबरोबर मंगळागौरच्या गाण्यांवर हार्दिकनेही ठेका धरलेला पाहायला मिळाला.

आणखी वाचा – घरी गणरायाचे आगमन अन् मानाच्या गणपतींचे दर्शन, प्राजक्ता माळीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत, म्हणाली, “भाचीचं गणपती स्तोत्र पठण…”

त्यानंतर आता हार्दिकने गणपती बाप्पाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोखालील कॅप्शनने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हार्दिकने कॅप्शन देत म्हटलं आहे की, “‘जोश्यांचा राजा २०२३’ बायकोचा पहिला गणपती”. हार्दिकने बायकोच्या पहिल्या गणेशोत्सवाचे काही फोटोही सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. त्यांच्या फोटोसवर त्यांच्या चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Tags: akshaya deodharentertainmentganeshotsavhardeek joshi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
Sankarshan Karhade Shared Experience

'पायलटची खुर्ची, माॅनिटर, टेक ऑफ लॅंडिंगची दांडी….', एका स्माईलने संकर्षणने घेतला कधीही न घेतलेला अनुभव, म्हणाला, "विमानाच्या केबिनमध्ये…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.