सोशल मीडियावर जसे कलाकार चर्चेत असतात तशी त्यांची मुलं देखील कायम चर्चेत असतात. अशातच गायक, संगीतकार राहुल देशपांडे यांची लाडकी लेक रेणुका देशपांडे सोशल मिडीयावर किती व्हायरल होते हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. सुप्रसिध्द गायक आणि संगीतकार राहुल देशपांडे यांची लाडकी लेक रेणुका ही अनेकदा विविध कारणांमुळे चर्चेत असते. आता तिची तुम्हाला वेगळी ओळख करुन द्यायची अजिबातच गरज नाही. रेणुका देशपांडे ही सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत असते ते तिच्या गोड आवाजाने आणि बाललीलांमुळे. (Rahul Deshpande Daughter)
गायक राहुल देशपांडे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. आणि त्याला कारण देखील तसंच आहे. राहुल देशपांडे लोकप्रिय आहेतच पण त्यांच्याबरोबरचं त्यांची मुलगी रेणुका देखील लोकप्रिय आहे. राहुल यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रेणुका फाडफाड इंग्लिश बोलताना दिसतेय. रेणुकाची आत्या तिला इंग्रजीचे धडे देतेय. आणि तिच्या शिकवणीनुसार रेणुका खूप छान इंग्रजी बोलताना दिसतेय. रेणुकाचा हा व्हिडीओ पाहून तिची इंग्रजी भाषेमध्ये बोलण्याची पद्धत खूप छान असल्याचं कळतंय.
रेणुकाच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत तिच्या या टॅलेंटचं कौतुक केलं आहे. यावर गायिका आनंदी जोशीने कमेंट करत म्हटलं आहे की, “मी हिच्याकडून शिकू शकते का? मला देखील इंग्रजी भाषा चोख बोलायला शिकायचं आहे”. तर एका युजरने कमेंट करत म्हटलं आहे की, “हे गोड मुली. मला पण शिकवना इंग्रजीमध्ये बोलायला. मी आता क्लासचं लावत नाही” अशी गमतीशीर कमेंट केली आहे. तर अनेकांनी रेणुकाने ही भाषा चोखपणे आणि अगदी लयीत बोलल्याने तिचं भरभरून कौतुक केलं आहे.
कोणत्याही स्टारकिडपेक्षा राहुल देशपांडेच्या मुलीचा सोशल मीडियावर बोलबाला आहे. निरागस रेणुकाची प्रत्येक व्हिडीओ, तिची गाणी, तिचे हटके पोज देत काढलेले फोटो चाहत्यांना आवडतात. ‘मोहे रंग दो लाल’ या गाण्यावर तिच्या अभिनयाने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.