ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची लेक आराध्या बच्चन कायमच चर्चेत असतात. ऐश्वर्याबरोबर आराध्यालाही आता चाहत्यांचं प्रेम मिळत आहे. आराध्याच्या शाळेतील ही अनेक कार्यक्रमांचे व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल होत असतात. अशातच ऐश्वर्याच्या लेकीचा म्हणजेच आराध्याचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला आहे. यांत ती ऐश्वर्याच्या वाढदिवसानिमित्त व्यक्त होताना दिसतेय. ऐश्वर्याचा नुकताच ५० वा वाढदिवस जोरदार साजरा करण्यात आला. (Aishwarya Rai Daughter Viral Video)
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायने तिचा ५०वा वाढदिवस साजरा केला. हा खास प्रसंग साजरा करण्यासाठी त्यांनी मुंबईत एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमाचे अनेक फोटो, व्हिडिओ समोर आले आहेत. यादरम्यान ती तिची लेक आराध्या आणि आई वृंदा रायबरोबर केक कापताना दिसली. दरम्यान या कार्यक्रमाला बच्चन कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित नव्हते. ऐश्वर्याच्या वाढदिवसाला बच्चन कुटुंबातील कोणीही उपस्थित नव्हतं, मात्र तिच्या लेकीने तिचा वाढदिवस खास बनवण्यात कोणतीही कसर सोडली नाही.
आराध्या बच्चनने तिच्या आईच्या वाढदिवसानिमित्त तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. ऐश्वर्याच्या वाढदिवसानिमित्त आराध्या पहिल्यांदाच मीडियासमोर बोलताना दिसली. सुरुवातीला बोलताना ती थोडीशी संकोच करत होती, पण तिच्या आईने तिला प्रोत्साहन दिल्यानंतर आराध्या भरभरून बोलली. आराध्या तिच्या आईची स्तुती करत भरभरून बोलली.
आराध्या म्हणाली, ‘शुभ संध्याकाळ, मला वाटते की हे माझे सुंदर आयुष्य तुझ्यामुळे आहे. आई तू मला जगण्याची उभारी देत आहेस. बरं मला असं वाटतं तू जे करत आहेस ते खरोखरच महत्त्वाचे आणि आश्चर्यकारक आहे. तू ज्या अर्थपूर्ण उद्देशाने जीवन जगत आहेस ते खरोखरचं समृद्ध व समाधानकारक आहे. तुझी सर्वांना मदत करण्याची वृत्ती ही खरोखरच अविश्वसनीय आहे.” यानंतर आराध्या गुडघ्यावर बसली आणि तिने सर्वांना धन्यवाद म्हटलं.
आराध्याला पहिल्यांदाच असं बोलताना पाहून ती खूप हुशार आहे असं चाहते म्हणत आहेत. ऐश्वर्याने तिला चांगले संस्कार दिल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे. ऐश्वर्याच्या आईला पाहून आराध्या तिच्या जवळ धावत गेली आणि तिचा हात हातात घेत तिला जवळ घेतलं हे पाहूनही अनेकांनी तिला चांगले संस्कार दिले असल्याचं म्हटले आहे.