Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Haldi and Wedding : सध्या सिनेसृष्टीमध्ये लग्नाची धामधूम असताना एकामागे एक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. सुरुची अडारकर व पियुष रानडे, तसेच प्रसाद जवादे व अमृता देशमुख या जोड्या काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकल्या. यानंतर आता ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीस आलेले मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे लग्नबंधनात अडकणार आहेत. ‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून दोघांनीही त्यांच्या गायनातून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली.
‘आमचं ठरलं’ म्हणत या दोघांनी सोशल मीडियावरुन त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली. त्यानंतर सगळ्यांच्याचं नजरा त्यांच्या लग्नाकडे लागून राहिल्या होत्या. अशातच ही जोडी आता लग्नबंधनात अडकणार असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना मिळाली आहे. दोघांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे त्यांचे लग्नाआधीच्या विधींचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. अत्यंत साधेपणाने ते लग्नसोहळा उरकणार आहेत.
काल मुग्धा व प्रथमेशच्या हळदीचे फोटो समोर आले. समोर आलेल्या फोटोंवरून अत्यंत साधेपणाने त्यांनी हळद उरकली असल्याचे पाहायला मिळालं. त्यानंतर आता प्रथमेशच्या ग्रहमखच्या फोटोंनी साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अवाढव्य खर्च, वा महागडे कपडे न परिधान करता अत्यंत साधेपणाने त्यांनी ग्रहमखची पूजा आटोपली आहे. प्रथमेशच्या ग्रहमखच्या लूकने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले, कारण या लूकमध्ये प्रथमेशचा पारंपरिक अंदाज प्रेक्षकांना विशेष भावला. चाहत्यांनी त्याच्या या पोस्टवर कमेंट करत त्याच्या साधेपणाचं कौतुकही केलं.
याआधी देखील प्रथमेश व मुग्धाच्या व्याहीभोजनाचे तसेच त्यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले होते. काही दिवसांपूर्वीच मुग्धाच्या मोठ्या बहिणीचं मृदुल हिचं लग्न देखील अत्यंत साधेपणाने झालं. मेहुणीच्या लग्नाला प्रथमेशने पारंपरिक अंदाजात हजेरी लावली होती. आता हळदी ग्रहमखचे फोटो समोर आल्यानंतर प्रथमेश व मुग्धाच्या लग्नाकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत. त्यांचा लग्न सोहळ्यातील लूक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून शुभेच्छांचा वर्षाव देखील केलेला पाहायला मिळत आहे