‘नवरी मिळे हिटलरला’ ही झी मराठीवरील मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. मालिकेत नुकताच एक नवीन ट्विस्ट आला तो म्हणजे यशच्या लग्नाचा. लीलाने रेवतीला तिचे लग्न यशबरोबर लावून देणार असल्याचे वचन दिलं आहे. पण एजेंच्या मनात काही वेगळंच आहे. श्वेताचे एजेंबरोबर लग्न ठरले होते, पण काही कारणांमुळे लीलाचे लग्न एजेंबरोबर होते. त्यामुळे आता एजे श्वेताबरोबर यशचे लग्न लावणार आहे. मात्र, दुर्गाच्या दबावामुळे यश आणि रेवती एजेला खरे सांगत नाहीत. आता मात्र मालिकेत ट्विस्ट येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. (Navri Mile Hitlerla Serial Updates)
एजेंना रेवतीच्या खऱ्या प्रेमाची जाणीव होणार असून ते रेवतीला तुझ्यामुळे मी माझा शब्द मागे घेत असल्याचे सांगतात. ‘झी मराठी’ वाहिनीने सोशल मीडियावर नवरी मिळे हिटलरला या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला रेवती दवाखान्यात असून एजे तिला भेटायला गेला आहे. रेवती रडत असून, “जे तू मला सांगितलं नाहीस, ते तुझ्या अश्रूंनी मला सांगितलं” असे एजे तिला म्हणून तिचे अश्रू पुसतो. तो तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतो, “तुझ्यापुढे माझा शब्द, माझं प्रॉमिस, सगळ्याची व्हॅल्यू झिरो आहे”. तर दुसरीकडे लीला यश व श्वेता यांचा साखरपुडा मोडण्यासाठी वेश बदलून जाते.
आणखी वाचा – The Great Indian Kapil Show मध्ये आठ वर्षांनी गोविंदा व कृष्णा अभिषेक पुन्हा एकत्र, अखेर कौटुंबिक वाद मिटले?
यश आणि श्वेताचा साखरपुडा चालू असताना गुरुजी सांगतात, “आता दोघांनी एकमेकांना अंगठ्या घाला”. तितक्यात लीला वेश बदलून येते आणि “थांबा”, असे म्हणते. त्यानंतर ती कसला तरी धूर करते. मग सर्वांच्या लक्षात येते की, यश जागेवर नाही. तेव्हा लक्ष्मी दुर्गाला म्हणते, “वहिनी यश कुठे आहे?” त्यानंतर दुर्गा यशला हाक मारते. त्यामुळे एकीकडे एजेंनी रेवतीच्या प्रेमाची जाणीव झाली आहे तर दुसरीकडे लीला यशला घेऊन गायब झाल्याचे या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
त्यामुळे आता मालिकेत पुढे काय होणार? यांची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. एजेंना रेवतीच्या प्रेमाची जाणीव झाल्यामुळे ते यश व रेवतीचे लग्न लावणार का? की लीला यशला घेऊन गायब झाल्यानंतर ती काही वेगळी खेळी खेळणार? आणि ही सत्य समजल्यानंतर एजे आणि लीला एकत्र येणार का? हे आगामी भागांममधून पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.