शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

घटस्फोटाच्या घोषणेनंतरही पत्नीचे ए. आर. रहमानवर प्रेम कायम, बदनामी करणाऱ्यांना ठणकावत म्हणाली, “आतापर्यंत गप्प होती पण…”

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 24, 2024 | 5:24 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Singer A. R. After Rahmans name linked with Mohini dey wife Saira Banu expressed her reaction.

ए.आर रहमानचे नाव मोहिनीबरोबर जोडल्यानंतर गायकाच्या पत्नीने सोडले मौन, त्याला बदनाम करु नका म्हणत शेअर केली पोस्ट

ए. आर. रहमान यांनी लग्नाच्या २९ वर्षांनंतर पत्नी सायरा बानोला घटस्फोट देण्याची घोषणा केली. रेहमान यांनी घटस्फोटाची घोषणा केल्यापासून ते चर्चेत आहेत. या बातमीने रहमानच्या चाहत्यांना खूप आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर काही तासांनी ए. आर. रहमान यांनी पतीपासून विभक्त झाल्याची घोषणा केल्याची बातमी समोर आल्यानंतर रहमान आणि मोहिनी यांच्याबद्दल सोशल मीडियावर अफवा पसरू लागल्या. मोहिनीमुळे ए. आर. रहमानने पत्नीला घटस्फोट दिल्याचे लोकांनी म्हटले. यावर स्वत: रहमान यांनी पोस्ट शेअर केली आहे. (A. R. Rahman wife reaction)

अशातच आता त्यांची पत्नी सायरा बानोनेही या प्रकरणी अता आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लोकांनी ए.आर रहमानचे नाव मोहिनीसोबत जोडल्यानंतर गायकाच्या पत्नीने या प्रकरणावर आपले मौन सोडले आहे. “हे सर्व करणे बंद करा” असं म्हणत तिने या प्रकरणी भाष्य केलं आहे. सायरा बानोच्या वकील वंदना शाह यांनी एक निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये सायरा पती ए. आर. रहमानला पाठींबा देताना पाहायला मिळत आहे. या निवेदनात सायरा म्हणाली की, “मी सध्या मुंबईत आहे आणि शारीरिकदृष्ट्या थोडासा कमजोर आहे. त्यामुळे मी आतापर्यंत गप्पच होती. पण मी सर्व YouTubers आणि तमिळ माध्यमांना आवाहन करतो की कृपया ए. आर. बद्दल कोणतीही चुकीची गोष्ट पसरवू नका”.

View this post on Instagram

A post shared by Irshad pklr (@_irshad_pklr_)

आणखी वाचा – The Great Indian Kapil Show मध्ये आठ वर्षांनी गोविंदा व कृष्णा अभिषेक पुन्हा एकत्र, अखेर कौटुंबिक वाद मिटले?

यापुढे ती असं म्हणाली की, “तो (रहमान) या जगातील सर्वोत्तम व्यक्ती आहे. तो एक मौल्यवान व्यक्ती आहे. कृपया या काळात त्यांना साथ द्यावी ही विनंती. माझा त्याच्यावर अतूट विश्वास आहे, जो आयुष्यभर टिकेल. ते जसे आहेत तसे राहू द्यावेत असे मी सर्वांना आवाहन करते. जोपर्यंत आम्ही अधिकृत काहीही म्हणत नाही, तोपर्यंत कृपया आमच्या गोपनीयतेचा आदर करा आणि रहमानचे नाव इतर कोणाशीही जोडणे थांबवा. तो खरंच खूप छान माणूस आहे. त्यांचे नाव खराब करु नका”.

आणखी वाचा – “तुला चित्रपटासाठी विचारणा होते का?”, चाहत्याचा जुई गडकरीला प्रश्न, अभिनेत्रीनेही दिलं थेट उत्तर, म्हणाली, “हवं तसं काम…”

दरम्यान, १९ नोव्हेंबर रोजी रहमान आणि त्याची पत्नी सायरा बानो यांनी २९ वर्षांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आणल्याची घोषणा केली. त्यानंतर काही वेळातच मोहिनी डेनेही पतीपासून घटस्फोट घेतल्याची चर्चा केली. या एकाच बातमीने सोशल मीडियावर खळबळ उडाली आणि मोहिनीमुळे रहमान आणि सायरा बानोचे नाते तुटल्याच्या अफवा पसरु लागल्या. यावर अता रहमान यांच्या पत्नीने भाष्य केलं आहे.

Tags: A. R. Rahman wife reactionA. R. Rehman wife Saira Bano reactionA. R. Wife Saira Bano's reaction to linking Rahman's name with Mohini
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Navri Mile Hitlerla Marathi serial update new promo Leela broke Yash and Shweta engagement by changing her look

Navri Mile Hitlerla : लीलाने मोडला यश-श्वेताचा साखरपुडा, वेश बदलून आली अन्...; एजेही देणार रेवतीची साथ, मालिकेत नवीन ट्विस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.