मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’साठी रणदीप हुड्डाने स्वतःमध्ये केला आहे इतका बदल, ओळखणंही कठीण, प्रेक्षक म्हणाले, “खरं टॅलेंट…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 19, 2024 | 12:49 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Randeep Hudda transformation

'स्वातंत्र्यवीर सावरकर'साठी रणदीप हुड्डाने स्वतःमध्ये केला आहे इतका बदल, ओळखणंही कठीण, प्रेक्षक म्हणाले, "खरं टॅलेंट..."

विविध चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिकांमुळे अभिनेता रणदीप हुड्डा हा सतत चर्चेत असतो. सध्या तो ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटामुळे अधिक चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये त्याने स्वातंत्र्य वीर सावरकरांची भूमिका निभावली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून प्रेक्षकांनी या ट्रेलरला खूप पसंती दर्शवली आहे. ही भूमिका करण्यासाठी रनदीप खूप कष्ट करताना दिसत आहे. त्याने चित्रपटातील भूमिकेला न्याय मिळावा यासाठी शरीरयष्टीमध्ये बदल केल्याचेही दिसून येत आहे. (Randeep Hudda transformation)

रणदीपने सोशल मीडियावर त्याने एक फोटो शेअर केला आहे. हे फोटो पाहून त्याच्या चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. यामध्ये त्याने आपले वजन कमालीचे कमी केले आहे. आपला फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये ‘काला पानी’ असे लिहिले आहे. या फोटोवरुन सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगल्यानंतर ते किती बारीक झाले असतील हे समजून येते. अशीच तब्येत रणदीपच्या फोटोमध्ये दिसून येत आहे. त्याच्या या ट्रान्सफॉर्मेशनचे खूप कौतुक होत आहे.

आणखी वाचा – नवस फेडायला पोहोचले थेट कोकणात, ‘नवरा माझा नवसाचा २’च्या शूटिंगसाठी कलाकारांचा ट्रेनने प्रवास, धमाल-मस्ती अन्…

View this post on Instagram

A post shared by Randeep Hooda (@randeephooda)

त्याच्या या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी लिहितो की, “याला म्हणतात खरा अभिनेता’, दुसरा नेटकरी लिहितो की, ‘सर आम्हाला तुमचा अभिमान आहे’, तिसरा नेटकरी म्हणतो की, ‘हे खरे टॅलेंट आहे. भूमिका साकारण्यासाठी काहीही करु शकतो’, अशा अनेक प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी रणदीपचे कौतुक केले आहे.

आणखी वाचा – ‘शक्तीमान’ रणवीर सिंह साकारणार म्हंटल्यावर नको नको ते बोलले, न्यूड सीनवरुनही हिणावलं, आता मुकेश खन्नांनी डिलीट केला व्हिडीओ कारण…

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट विनायक दामोदर सावरकर यांची जीवनकथा आहे. ते एक स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक व राजकीय नेते होते. त्यांची भूमिका रणदीप साकारणार आहे. या चित्रपटात त्याबरोबर अभिनेत्री अंकिता लोखंडेही दिसणार आहे. २२ मार्च २०२४ रोजी सर्व चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या आधी रणदीप ‘हायवे’, ‘सुलतान’ व ‘सरबजीत’ या अनेक चित्रपटांमध्ये दिसून आला आहे. या चित्रपटातील भूमिकांचेही खूप कौतुक करण्यात आले होते. तसेच तो आगामी अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारताना दिसणार आहे.

Tags: actor randeep huddainstagram postRandeep huddatransformation
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Simmi garewal on Shashi Kapoor

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला कॅमेऱ्यासमोरच काढावे लागले होते संपूर्ण कपडे, स्वतःच केला होता खुलासा, म्हणालेल्या, "टॉपलेस होताना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.