शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मनोज वाजपेयीचा ‘सायलेन्स’ ते राजपाल यादवचा ‘काम चालू है’, येत्या आठवड्यात ड्रामा, थ्रिलर व सस्पेन्सने भरलेले चित्रपट पाहता येणार, जाणून घ्या…

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 16, 2024 | 12:22 pm
in Entertainment
Reading Time: 7 mins read
google-news
Silence 2, Kaam Chalu Hai and Article 370 will be released on ott see the details

मनोज वाजपेयीचा ‘सायलेन्स’ ते राजपाल यादवचा ‘काम चालू है’, येत्या आठवड्यात ड्रामा, थ्रिलर व सस्पेन्सने भरलेले चित्रपट पाहता येणार, जाणून घ्या...

ओटीटी वापरकर्त्यांसाठी येता आठवडा हा खूपच खास असणार आहे. येत्या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. येत्या आठवड्यात ओटीटीवर मनोज वाजपेयी, राजपाल यादव व यामी गौतमचा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात ओटीटी वापरकर्त्यांसाठी मनोरंजनाची खास पर्वणी असणार आहे. चला तर जाणून घेऊयात येत्या आठवड्यात प्रदर्शित होणारे हे बहुचर्चित चित्रपट कोणते?

सायलेन्स २ : मनोज वाजपेयी यांच्या ‘सायलेन्स’ चित्रपटाचा दुसरा भाग येत्या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. हा एक क्राइम थ्रिलर चित्रपट आहे, ज्यात मनोज बाजपेयी यांनी एसीपी अविनाश वर्मा यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट येत्या १६ एप्रिल रोजी झी-०५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता वकार शेखदेखील आहे, ज्याने ‘अनुपमा’ या टीव्ही मालिकेत यशदीपची भूमिका साकारली होती.  अबन भरुचा देवहंसचा चित्रपट, सायलेन्स 2: द नाईट आऊल बार शूटआउट, मनोज बाजपेयी एसीपी अविनाश वर्माच्या भूमिकेत आहेत. प्राची देसाईने इन्स्पेक्टर संजना भाटियाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये साहिल वैद, पारुल गुलाटी, वकार शेख, अंकित भारद्वाज आदींचाही समावेश आहे.

View this post on Instagram

A post shared by ZEE5 (@zee5)

काम चालू है : राजपाल यादवचा प्रसिद्ध चित्रपट ‘काम चलू है’ देखील येत्या आठडव्यात १९ एप्रिल रोजी झी-०५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात राजपाल यादव रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आपल्या मुलीला गमावतो, ज्याच्या विरोधात तो प्रशासनाशी लढतो आणि रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम करतो. चित्रपटात राजपाल यादव यांच्याबरोबर जिया मानेक आणि कुरंगी नागराज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन पलाश मुच्छाळ यांनी केले आहे.

आणखी वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये कार्तिकचं सत्य सांगूनही इंद्राचा मुक्ताला दोष, सागरसमोर प्रकरण येताच घेणार का बायकोची बाजू?

View this post on Instagram

A post shared by Palaash Muchhal (@palash_muchhal)

आणखी वाचा – “माझं लग्न झाल्यानंतर…”, कायमची मुंबई सोडून सासू-सासऱ्यांबरोबर अलिबागमध्ये राहते प्रार्थना बेहेरे, म्हणाली, “माझ्या नवऱ्याने…”

आर्टिकल ३७० : यामी गौतमचा चित्रपट ‘आर्टिकल ३७०’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता ओटीटीवरही प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट १९ एप्रिल रोजी जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सुहास यांनी केले आहे. ‘आर्टिकल 370’ हा चित्रपट आदित्य सुहास जांभळे यांनी दिग्दर्शित केला असून, त्यात प्रियामणी, अरुण गोविल, वैभव तत्त्ववादी, स्कंद ठाकूर, अश्विनी कौल, किरण करमरकर, दिव्या सेठ शाह, राज झुत्शी, सुमित कौल, राज अर्जुन, असित गोपीनाथ रेडीज, अश्वनी कुमार आणि इरावती हर्षे मायदेव हे इतर कलाकार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Jio Studios (@officialjiostudios)

Tags: article 370Kaam Chalu HaiSilence 2
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Ravi Kishan Wife Statement

"२८वर्षांपूर्वी आमचं लग्न झालं आणि…", रवी किशन यांच्या विरोधात महिलेचा अजब दावा, म्हणावी, "आमच्या मुलीसाठी मी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.