बरेच असे कलाकार आहेत जे नेहमीच शूटिंगच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून कुटुंबियांसह, मुलाबाळांबरोबर पाहायला मिळतात. बरेचदा ही कलाकार मंडळी त्यांच्या मुलांसह बाहेर फिरताना दिसतात. मुलांबरोबर वेळ घालवण्यानंतरचे बरेच खास क्षण हे कलाकार चाहत्यांसह सोशल मीडियावरून शेअर देखील करतात. तसेच बरेच असे कलाकार आहेत जे कामाबरोबरच आई वडील म्हणून आपल्या पाल्याची उत्तम जबाबदारी पेलवतात. यांत एक नाव आवर्जून घेता येईल ते म्हणजे सिद्धार्थ जाधव.
अभिनेता सिद्धार्थ जाधवने आजवर त्याच्या अभिनयाने साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. शिवाय एक उत्तम पालक म्हणूनही त्याच सगळीकडून कौतुक करण्यात येत. सिद्धार्थला दोन लेकी आहेत. सिद्धार्थचं त्याच्या दोन्ही मुलींवर विशेष प्रेम आहे. तो कायमच त्याच्या मुलींबरोबरचे अनेक फोटोस, व्हिडीओ शेअर करत असतो. सिद्धार्थच्या दोन्ही मुली म्हणजेच स्वरा व इरा या कायमच त्याच्याबरोबर दिसतात. अनेकदा दोघी सिद्धार्थसह कार्यक्रमांनाही हजेरी लावतात. (Siddharth Jadhav On His Daughter)
अशातच सिद्धार्थने नुकताच एक लेकीचं कौतुक करणारा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. यांत त्याने त्याची मोठी मुलगी स्वराचा गाणं गातानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यांत स्वरा “तेरा मुझसे है पेहले का नाता कोई” हे गाणं गात आहे. सिद्धार्थने स्वराचा गाणं गातानाचा व्हिडीओ शेअर केला असून त्याखाली कॅप्शन देत त्याने लिहिलं आहे की, “लव्ह यु स्वरा. “तेरा मुझसे है पेहले का नाता कोई” स्पेशल दिवस, स्पेशल माणसं, स्पेशल गाणं. स्वरा” असं म्हटलं आहे. यावरून स्वराने हे गाणं स्पेशल दिवशी सिद्धू साठी म्हटलं असल्याचं कळतंय.
आणखी वाचा – अक्षरा-अधिपतीच्या लग्नात भूवनेश्वरीचीच हवा, भरजरी साडी, दागिन्यांनी वेधलं लक्ष
सिद्धार्थला त्याच्या दोन्ही मुली विशेष प्रिय आहेत. तो नेहमीच त्यांच्या अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर करत असतो. अशातच सिद्धार्थने शेअर केलेला हा स्वराचा व्हिडीओ चाहत्यांना आवडला असून अनेकांनी कमेंट करत स्वराचं कौतुक केलं आहे. तर अनेकांनी या व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.