झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ सध्या रंजक वळणावर आहे. कथानक, ट्विस्ट आणि पात्रांमुळे अवघ्या कमी कालावधीत ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. शिवाय, मालिकेतील मुख्य कलाकारांसह अन्य कलाकारांच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुक केले. काही दिवसांपूर्वी मालिकेत अक्षरा व अधिपतीचा साखरपुडा सोहळा पार पडला. आता प्रेक्षकांना अक्षरा व अधिपतीचा भव्यदिव्य विवाहसोहळा पाहायला मिळणार आहे. (Bhuvaneshwari look in Akshara-Adhipati Wedding)
गेल्या अनेक दिवसांपासून अक्षरा व अधिपतीच्या विवाहसोहळ्याची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. लवकरच मालिकेत आपल्याला मेहंदी व हळदीचा कार्यक्रम पाहायला मिळेल. एकूणच, लग्नसोहळ्याच्या निमित्ताने दोन्ही कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे. अक्षरा व अधिपतीच्या घरी लग्नसराईची मोठी लगबग पाहायला मिळते. आपल्या मुलाचं लग्न भव्यदिव्य व्हावं, अशी अधिपतीची आई म्हणजे भूवनेश्वरीची इच्छा आहे. त्यामुळे अधिपतीच्या घरी या सोहळ्याची जय्यत तयारी सध्या सुरु आहे.
हे देखील वाचा – ‘तू चाल पुढं’मधील शिल्पीने मुबंईमध्ये खरेदी केलं स्वप्नातलं घर, अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली, “स्वप्न खरी होतात…”
लग्नसोहळ्यामधील अक्षरा व अधिपतीचा लूक नुकताच समोर आला होता. आता अधिपतीची आई भुवनेश्वरीचाही या लग्नसोहळ्यातील लूक समोर आला असून तिच्या लूकची जोरदार चर्चा होत आहे. पीच रंगाची साडी, भरजरी शाल, त्यावर केलेला टेंम्पल ज्वेलरीचा साज आणि नाकातली नथ यांमध्ये त्या अगदी खुलून दिसत आहे.
हे देखील वाचा – “तुझी जागा…”, बहिणीच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीची भावुक पोस्ट, म्हणाली, “तू मला…”
अधिपती व अक्षरा हे दोघेही केवळ एकमेकांचे मित्र होते. मात्र, अक्षराच्या बहिणीचा खोटेपणा सर्वांसमोर आल्यामुळे तिला अखेर भुवनेश्वरीच्या पायावर नाक घासून लग्नासाठी तयार व्हावे लागले. एकीकडे हे सगळं घडत असताना अधिपतीला सत्य गोष्ट माहित नसते. कारण अधिपती जरी अक्षरावर प्रेम करत असला, तरी ती या लग्नासाठी का तयार झाली? असा प्रश्न त्याला पडला आहे. एकीकडे त्याला या लग्नाचा आनंद आहेच. मात्र, या सगळ्याचा तिच्यावर काय परिणाम होईल, याचा विचारदेखील तो करत आहे. आता अक्षरा व अधिपतीच्या लग्नामध्ये आणखी कोणते नवे ट्वीस्ट येणार हे पाहणंही रंजक ठरणार आहे.