झी मराठी वाहिनीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील राघव व आनंदी यांच्या जोडीला तर प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. या मालिकेत आलेल्या वेगवेगळ्या वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतेय. मालिकेत एका मागोमाग आलेल्या कठीण प्रसंगांना आनंदीने अगदी पद्धतशीर हाताळत प्रत्येक मार्ग मोकळा केला. घरातल्या प्रत्येक माणसाला आनंदीने आपलंस केलं आणि प्रत्येकाला वेळोवेळी समजूनही घेतलं. (Nava Gadi Nava Rajya)
आता मालिकेत असे पाहायला मिळतंय की, राघव नव्याने आयुष्याला आणि कामाला सुरुवात करणार असल्याचं समोर आलं आहे. राघवन आधीच्या नोकरीवर राजीनामा दिला असून त्याने स्वतःची लॉ फर्मदेखील सुरु करायचं ठरवलं आहे. राघव स्वतःचं हक्काचं ऑफिस घेऊन नव्याने कामाची सुरुवात करणार आहे. यासाठी त्याला रमाच्या वडिलांनी म्हणजेच पाटकर बाबांनी मदत केली आहे. रमाच्या बाबांनी राघवला २० लाख रुपयांची मदत केली आहे. त्यांच्याच मदतीने आता राघव आयुष्यात पुढे जाणार आहे.
आनंदीच्या हट्टामुळे राघवने नव्या कामाची सुरुवात करण्याचं धाडसी पाऊल उचललं आहे. राघवने नव्याने आयुष्याला आणि कामाला सुरुवात करणार असल्याचं ठरवलं असलं तरी, आता त्याच्या आयुष्याचं एक जुनं पान पुन्हा उघडलं जाणार आहे. म्हणजेच मालिकेत आता पुन्हा एकदा रमाची एंट्री होणार असल्याचं समोर आलं आहे. मालिकेत आता प्रेक्षकांना राघव व आनंदीबरोबर पुन्हा एकदा रमाची धमाल पाहायला मिळणार आहे.अर्थात रमाच्या परत येण्याने आता राघवच्या आयुष्यात काय नवं वळण येणार, हे मालिकेत पाहणं रंजक ठरणार आहे.
आणखी वाचा – अक्षरा-अधिपतीच्या लग्नात भूवनेश्वरीचीच हवा, भरजरी साडी, दागिन्यांनी वेधलं लक्ष
रमाचं पुन्हा पृथ्वीवर येणं हे एखाद्या कारणामुळे आहे. हे कारण नेमकं काय असेल, हे लवकरच समोर येणार आहे. राघव व आनंदी यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींना आधी रमा सामोरी जाणार आहे. रमाच्या येण्याने आता आनंदी व राघव यांच्यावरील संकट कमी होतील का हे पाहणं ही रंजक ठरणार आहे. तसेच दुसरीकडे आनंदी देखील सगळ्यांना गोड बातमी देणार आहे. तिच्याकडे आता नवा गोड पाहुणा लवकरच येणार आहे.