गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“एवढा मोठा निर्णय तू…”, सासूबाईंनी दुसरं लग्न करताच मिताली मयेकरने शेअर केली पोस्ट, म्हणाली, “माझ्या सासूचं लग्न हे…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 23, 2023 | 10:24 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
mitali mayekar on mother in law wedding

“एवढा मोठा निर्णय तू...”, सासूबाईंनी दुसरं लग्न करताच मिताली मयेकरने शेअर केली पोस्ट, म्हणाली, “माझ्या सासूचं लग्न हे...”

Mitali Mayekar On Mother In Law Wedding : मराठी चित्रपटसृष्टीमधील नावाजलेल्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे सिद्धार्थ चांदेकर. सिद्धार्थने आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. कामाबरोबरच तो त्याच्या खासगी आयुष्यामुळेही सतत चर्चेत राहिला आहे. सिद्धार्थ व मिताली मयेकर या जोडीला तर त्यांचे चाहते भरभरुन प्रेम देतात. आता सिद्धार्थने खास पोस्ट शेअर करत सगळ्यांबरोबर आनंदाची बातमी शेअर केली आहे. सिद्धार्थची आई दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली आहे.

सिद्धार्थने आईच्या लग्नाचे फोटो शेअर करत तिच्यासाठी खास पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये आईचं लग्न मी लावून दिलं असल्याचं त्याने म्हटलं. सिद्धार्थच्या या निर्णयाचं सगळेचजण सोशल मीडियावर कौतुक करत आहेत. आता सिद्धार्थ पाठोपाठ मितालीनेही सासूबाईंसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. तसेच तिचा आनंद व्यक्त केला.

आणखी वाचा – दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली सिद्धार्थ चांदेकरची आई, अभिनेता म्हणतो, “आता मी तुझं लग्न लावतोय कारण…”

मिताली म्हणाली, “सासूबाई सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा. माझ्या सासूचं लग्न! किती सूना हे म्हणू शकतात की मी माझ्या सासूच्या लग्नात हजर होते? खरंच मला अभिमान वाटतो तुझा की, हा एवढा मोठा निर्णय तू अगदी न डगमगता घेतलास”. मितालीने सासूबाईंचं अगदी तोंडभरुन कौतुक केलं.

आणखी वाचा – Video : देवदर्शन करतेय अमृता खानविलकर, अमरनाथ यात्राही केली पूर्ण, यात्रेविषयी म्हणाली, “मुक्या प्राण्यांना त्रास…”

View this post on Instagram

A post shared by Mitali Mayekar Chandekar ???? (@mitalimayekar)

पुढे मिताली म्हणाली, “मला अभिमान वाटतो तुझ्या मुलाचा की, तोसुद्धा खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा राहिला. या एका अतिशय कमाल कुटुंबाचा एक भाग असण्याचा मला अभिमान वाटतो. आजवर तू आमच्या सगळ्यांसाठी सगळं अगदी मनापासून केलंस. पण आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आलीये. अशीच कायम आनंदात राहा, हसत राहा. बाकी आम्ही मुलं तुझ्याबरोबर आहोतच. तुला आणि नितिन काकांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम”. मितालीने शेअर केलेल्या या पोस्टचं सगळेच जण अगदी कौतुक करत आहे. तसेच सिद्धार्थची आई सीमा चांदेकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Tags: entertainment newsmarathi actressmitali mayekarsiddharth chandekar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Akshay Kumar fitness :
Lifestyle

‘या’ बॉलिवूड अभिनेत्याने १५ वर्षांपासून खाल्ला नाहीय समोसा, वयाच्या ५९ व्या वर्षी आहे इतका फिट, कारण आहे…

एप्रिल 16, 2026 | 11:00 am
Reasons For Sugar Cravings 
Lifestyle

जेवणानंतर आपल्याला मिठाई का हवी असते?, आयुर्वेदात दडलंय याचं रहस्य, वाचा सविस्तर

एप्रिल 16, 2026 | 10:10 am
Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Next Post
Siddharth Chandekar mother Second Marriage

सिद्धार्थ चांदेकरच्या आईच्या दुसऱ्या लग्नाचं मराठी कलाकारांना कौतुक, फोटो पाहताच निवेदिता सराफ म्हणाल्या, "तुझ्यासारखा मुलगा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.