मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळा स्थान निर्माण केलं आहे. चित्रपट, नाटक व मालिका अशी सर्वच माध्यमे त्यांनी गाजवली असून त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. पण गेल्या काही दिवसांपासून शुभांगी गोखले चर्चेत येण्यामागचं कारण आहे. ती म्हणजे त्यांची नवीन मालिका. शुभांगी गोखले ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका घेऊन येणार आहे. या मालिकेतून त्या छोट्या पडद्यावर परतणार आहेत. (Shubhangi Gokhale)
एकीकडे या मालिकेचे जोरदार प्रमोशन सुरु असताना अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी वेळ काढून एका खास मैत्रिणीच्या घरी गेल्या होत्या. ती मैत्रीण दुसरी, तिसरी नसून अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आहे. अभिनेत्री शुभांगी गोखले तिची खास मैत्रीण सोनाली कुलकर्णीच्या घरी गेली होती. पण या केवळ एकट्याच गेल्या नाहीत, तर त्यांच्यासह लेक सखी व जावई सुव्रत जोशी देखील त्यांच्यासह गेले होते. या क्षणाचे फोटो सोनालीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचं ठरलं, बॉयफ्रेंडबरोबरचा फोटो शेअर करत सांगितली लग्नाची तारीख
या फोटोजमध्ये गोखले कुटुंब सोनालीच्या कुटुंबाबरोबर काही क्षण घालवताना दिसत आहे. तर, दुसऱ्या एका फोटोत त्या सोनाली व तिच्या कुटुंबासह गप्पा मारताना दिसत आहे. या फोटोसोबत सोनालीने एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात ती म्हणते, “असे जीवलग घरी यावे.. त्यांनी आपल्यासाठी वेळ काढावा.. अशा निवांत गप्पा रंगाव्या.. ह्या गोड दिवसातच आनंदानं रूतून बसलंय मन.. खूप प्रेम आणि प्रेम.. आम्ही तुम्हाला सोडणारच नव्हतो.”
आणखी वाचा – रवींद्र महाजनींच्या मृत्यूमागचं खरं कारण काय?, गश्मीर महाजनीने सांगितलं सत्य, म्हणाला, “त्यांचा मृत्यू…”

अभिनेत्री शुभांगी गोखले व त्यांचा जावई गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. शुभांगी गोखले यांची स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर, सुव्रत जोशीचे नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘ताली’ वेबसीरिज मधील भूमिकेचे प्रचंड कौतुक होत आहे. (Shubhangi Gokhale visits Sonali Kulkarni Home)