शुक्रवार, मार्च 6, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

स्वतःच्याच साड्यांचा सेल करतात शुभांगी गोखले, किंमत ऐकून तुम्हालाही खरेदी करण्याचा होईल मोह, म्हणाल्या, “सिल्क साड्या…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 30, 2023 | 5:34 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Shubhangi Gokhale talks her Saree Collection

शुभांगी गोखले दर दोन वर्षांनी करतात त्यांच्या साड्यांचा सेल, स्वतःच खुलासा करत म्हणाल्या, "साड्यांना..."

अभिनेत्री शुभांगी गोखले या गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वात सक्रिय आहे. त्यांनी आजवर अनेक हिंदी व मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ असो, किंवा ‘काही दिया परदेस’ मालिका, किंवा ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपट असो, शुभांगी यांनी त्यांच्या कामातून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. टीव्ही विश्वातील या दिग्गज अभिनेत्री सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर नुकतंच सुरु झालेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत महत्वाची भूमिका साकारताना दिसतात. (Shubhangi Gokhale talks her Saree Collection)

अवघ्या काही दिवसांवर दिवाळी आली. त्यानिमित्ताने अनेकांच्या घरी मोठी लगभग सुरु आहे. घराची सजावट असो, किंवा फराळ बनवणे, यांमध्ये अनेक जण आपला मोलाचा वाटा देताना दिसत आहे. तसेच, फटाक्यांची आतषबाजी या सणात डोळ्यांचे पारणे फेडताना दिसते. केवळ सर्वसामान्य नाही, तर अनेक कलाकार दिवाळीनिमित्त विविध तयारीत जुंपले आहेत. नुकताच स्टार प्रवाहचा ‘ढिंचॅक दिवाळी २०२३’ सोहळा पार पडला. या सोहळ्यात शुभांगी गोखले यांच्या रेड कार्पेटवरील एन्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधले होते. यावेळी ‘इट्स मज्जा’शी संवाद साधताना शुभांगी यांनी त्यांच्या साड्यांबाबत मोठा खुलासा केला आहे.

हे देखील वाचा – Video : …अन् भर रिसेप्शन पार्टीत रेखा यांनी घेतले शत्रुघ्न सिन्हा यांचे आशीर्वाद, पत्नी व लेक सोनाक्षीची घेतली गळाभेट, व्हिडीओ व्हायरल

यावेळी शुभांगी गोखले यांना त्यांच्या साड्यांच्या कलेक्शनबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, “माझ्याकडे सिल्क व कॉटन यांमध्ये जवळपास २०० साड्या आहेत. ज्यात सिल्कमध्ये साऊथ सिल्क, मुंगा कोसा सिल्क, व बिहार व आसामच्या सिल्क साड्या, तर बंगालची कॉटन साडी किंवा आपल्या महाराष्ट्राची इरकली साडी असतील. असं असूनही मी या साड्या इतरांना देऊन टाकते. कारण माझ्या घरात सेल असतो. दर दोन ते तीन वर्षांनी मी माझ्या घरात हा साड्यांचा सेल भरवते. आणि गंमत म्हणून त्या साड्यांना १० रुपये, १५ रुपये अशा किमती लावते. उदाहरण द्यायचं झाल्यास, गेल्यावर्षी माझी एक मैत्रिण होती जिचा स्वतःचा साड्यांचा ब्रँड आहे. तर तिने माझ्याकडील तब्बल १९ साड्या घेऊन गेल्या होत्या. आपण नाही निदान दुसरं कोणीतरी या साड्या वापरतील, या हेतूने मी या साड्यांचा सेल भरवते.”

हे देखील वाचा – ‘मुरांबा’ मालिकेत येणार मोठं ट्विस्ट, अक्षयचा होणार अपघात? व्हिडीओ पोस्ट करत अभिनेता म्हणाला, “ही पडद्यामागची…”

पुढे शुभांगी यांना त्यांच्या आयुष्यातील रॉकेटबद्दल विचारले होते. त्यावेळी त्या म्हणाल्या, “खरंतर मी माझ्या कामाला फार उशिरा सुरुवात केली. ‘डॅडी समजा करो’ नावाची मालिका त्यावेळी मी करत होती. ‘देख भाई देख’ फेम आनंद मंहेंद्रू हे या मालिकेचे निर्माते होते. या मालिकेत काम करणं माझ्यासाठी खूप आवाहनात्मक होतं. मालिकेत मी जी भूमिका केली होती. ते पाहून आमच्या निर्मात्यांनी माझ्या वडिलांसमोर माझं कौतुक केलं, ते माझ्यासाठी एक मोठं रॉकेट होतं.”

Tags: premachi goshtashubhangi gokhaleShubhangi Gokhale talks her Saree Collectionstar pravah
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Varsha Usgaonkar cheated in 47 lakh investment scam
Entertainment

प्रसिद्ध अभिनेत्रीची बिल्डरकडून मोठी फसवणूक, ४७ लाखांचा गंडा, नेमकं प्रकरण काय?

मार्च 5, 2026 | 5:17 pm
Anurag Doval UK07 Rider crying in YouTube video
Entertainment

आई-वडिलांकडून छळ, भावाने सगळंच हडपलं अन्…; ‘बिग बॉस १७’ फेम स्पर्धकाची वाईट अवस्था, म्हणाला, “आत्महत्या…”

मार्च 5, 2026 | 12:43 pm
Mugdha Vaishampayan Puranpoli Video
Entertainment

Video : सासूबाईंच्या मार्गदर्शनाखाली मुग्धा वैशंपायनने बनवल्या पुरणपोळ्या, नवऱ्याच्या कमेंटने वेधलं लक्ष

मार्च 5, 2026 | 11:59 am
Rashmika Mandanna Red Saree
Entertainment

लाल रेशमी साडी, पांढरा रेशमी कुर्ता आणि…; हैदराबाद रिसेप्शनमधील रश्मिका-विजयच्या लूकने वेधलं लक्ष, साऊथ इंडियन लूकमध्ये दिसले

मार्च 5, 2026 | 10:43 am
Next Post
Kangana Ranaut appeals to fans for watch 'Tejas' movie

'तेजस' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपयश मिळताच कंगना रणौतने शेअर केला व्हिडीओ, म्हणाली, "९९ टक्के चित्रपटांना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.