शनिवार, एप्रिल 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : सासूबाईंच्या मार्गदर्शनाखाली मुग्धा वैशंपायनने बनवल्या पुरणपोळ्या, नवऱ्याच्या कमेंटने वेधलं लक्ष

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 5, 2026 | 11:59 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Mugdha Vaishampayan Puranpoli Video

Video : सासूबाईंच्या मार्गदर्शनाखाली मुग्धा वैशंपायनने बनवल्या पुरणपोळ्या, नवऱ्याच्या कमेंटने वेधलं लक्ष

Mugdha Vaishampayan Puranpoli Video : ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’मधील पहिल्या पर्वात झळकलेले प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिले. दोन वर्षांपूर्वी ही जोडी लग्नबंधनात अडकली. ‘आमचं जुळलं’ म्हणत दोघांनी सोशल मीडियाद्वारे प्रेमाची कबुली दिली. लग्नानंतर मुग्धा-प्रथमेश नेहमीच चर्चेत राहिले. लग्नानंतर मुग्धा-प्रथमेश यांनी मिळून प्रत्येक सणवार साजरे केले. बरेचदा मुग्धा तिच्या सासरी गावी आरवलीमध्ये सणवार साजरे करताना दिसली. आता होळीनिमित्त ही प्रेक्षकांची लाडकी जोडी कोकणात गेली आहे. आणि कोकणात शिमग्याचा आनंद लुटताना दिसत आहे.

स्टोरीमध्ये दोघांनी शिमग्यातील पालखीचा फोटो पोस्ट केला. याशिवाय गावाच्या होळीचे खास व्हिडीओदेखील शेअर केले आहेत. होळी ही पुरणपोळीशिवाय अपूर्ण आहे. आणि अशातच मुग्धाने तिच्या सासरी पहिल्यांदा पुरणपोळी बनवली. मुग्धाला पुरणपोळी बनवताना येत नाही, आणि म्हणूनच ती पुरणपोळी बनवायचे धडे सासूबाईंकडून घेताना दिसली. मुग्धाने स्वतःच पुरणपोळी बनवतानाचा व्हिडीओ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

आणखी वाचा – लाल रेशमी साडी, पांढरा रेशमी कुर्ता आणि…; हैदराबाद रिसेप्शनमधील रश्मिका-विजयच्या लूकने वेधलं लक्ष, साऊथ इंडियन लूकमध्ये दिसले

View this post on Instagram

A post shared by Mugdha Bhagawan Vaishampayan (@mugdhabhagawan5)

या व्हिडीओमध्ये मुग्धा परफेक्ट पुरणपोळी बनवताना दिसत आहे. पुरणपोळी बनवण्याचा प्रयत्न करत आहे”, असं म्हणत तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. “नीना काकूच्या (सासूमाँ) हाताखाली पुरणपोळी करण्याचा प्रयत्न. जरा अवघड आहे करणं. पण मजा आली. होळी पौर्णिमेच्या खूप शुभेच्छा”, असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री देतेय कर्करोगाशी लढा, आजारपणाबाबत केली पोस्ट, म्हणाली, “माझ्या आई-वडिलांना…”

मुग्धाला पुरणपोळी बनवताना पाहून प्रथमेशने व्हिडीओवर कमेंट केली आहे. रेड हार्ट ईमोजी शेअर करत त्याने बायकोच्या मेहनतीचं कौतुक केलं आहे. याशिवाय नेटकऱ्यांनीही पुरणपोळी बनवताना मुग्धाच कौतुक केलं आहे.

Tags: holi videomugdha vaishampayanprathmesh laghate
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Raj Sharma Passes Away
Entertainment

प्रसिद्ध कॉमेडियनचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन, बऱ्याच दिवसांपासून होते रुग्णालयात, मृत्यूचे कारण अस्पष्ट

एप्रिल 25, 2026 | 1:12 pm
Biplab Dasgupta death
Entertainment

वयाच्या ७५व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, रुग्णालयात नेतानाच वाटेत मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

एप्रिल 25, 2026 | 11:58 am
anupam kher sold mumbai home
Entertainment

भाड्याने राहायला सुप्रसिद्ध अभिनेत्याने विकलं घर, २२ वर्षात आलिया भट्टने घेतल्या अभिनेत्याच्या दोन्ही मालमत्ता, किंमत…

एप्रिल 25, 2026 | 10:18 am
Nehha Pendse tv shows
Entertainment

“त्याने मला अचानक पकडलं”, मुंबईच्या भररस्त्यात अभिनेत्रीसह घडलं असं काही की…; म्हणाली, “जवळ जाऊन…”

एप्रिल 25, 2026 | 9:57 am
Next Post
Anurag Doval UK07 Rider crying in YouTube video

आई-वडिलांकडून छळ, भावाने सगळंच हडपलं अन्…; 'बिग बॉस १७' फेम स्पर्धकाची वाईट अवस्था, म्हणाला, "आत्महत्या…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.