गुरूवार, मे 15, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : …अन् भर रिसेप्शन पार्टीत रेखा यांनी घेतले शत्रुघ्न सिन्हा यांचे आशीर्वाद, पत्नी व लेक सोनाक्षीची घेतली गळाभेट, व्हिडीओ व्हायरल

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 29, 2023 | 4:37 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rekha touches feet of Shatrughan Sinha

Video : …अन् भर रिसेप्शन पार्टीत रेखा यांनी घेतले शत्रुघ्न सिन्हा यांचे आशीर्वाद, पत्नी व लेक सोनाक्षीची घेतली गळाभेट, व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये ४०० हून अधिक चित्रपटांत काम केलेलं आहे. त्यांच्या अभिनय व सौंदर्यांने त्या काळातील प्रेक्षकांना मोहित केलं आहे. जरी त्या सत्तरीच्या उंबरठ्यावर असल्या, तरी त्यांचं सौंदर्य आजच्या तरुणींना लाजवणारा आहे. सध्या त्या अभिनय क्षेत्रात सक्रिय नाही. पण त्या विविध सोहळ्यांमध्ये नेहमीच हजेरी लावतात, ज्याची चर्चा सोशल मीडियावर नेहमीच होत असते. या एव्हरग्रीन अभिनेत्रीचा असाच एक व्हिडीओ नुकतंच सोशल मीडियावर व्हायरल झाला, जो बराच चर्चेत आला आहे. (Rekha touches feet of Shatrughan Sinha)

नुकतंच मुंबईत एका उद्योगपतीच्या मुलाचा रिसेप्शन सोहळा पार पडला. यावेळी रेखा यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे त्यांच्या पत्नी व अन्य कुटुंबियांसह आले होते. यावेळी रेखा या मंडपातून बाहेर पडताच लेक सोनाक्षीला मिठी मारली. तिच्याशी काही वेळ गप्पा मारल्यानंतर व त्यांच्या पत्नीकडे येताच रेखा यांनी सर्वप्रथम अभिनेत्याच्या पाया पडत त्यांचे आशीर्वाद घेतले. पुढे शत्रुघ्न यांची पत्नी पूनम यांनी रेखाची गळाभेट घेतली. त्यानंतर रेखा व सिन्हा कुटुंबीयांनी उपस्थित पापाराझींना एक झलक घेण्यासाठी पोझ दिली.

हे देखील वाचा – ‘मुरांबा’ मालिकेत येणार मोठं ट्विस्ट, अक्षयचा होणार अपघात? व्हिडीओ पोस्ट करत अभिनेता म्हणाला, “ही पडद्यामागची…”

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

या सोहळ्यासाठी रेखा यांनी निळ्या रंगाची सिल्क साडी आणि त्यावर मनमोहक असे दागिने परिधान केले होते, जे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. तर शत्रुघ्न व त्यांच्या पत्नीने पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. तर सोनाक्षीनेही तिच्या पारंपरिक लूकने उपस्थित पापाराझींचे लक्ष वेधून घेतले होते. दरम्यान, त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहते व नेटकऱ्यांनी रेखा यांचं भरूभरून कौतुक केले.

हे देखील वाचा – सासूबाईंची साडी नेसून रेड कार्पेटवर आली उर्मिला कोठारे, म्हणाली, “माझ्या सासरी…”

दरम्यान, रेखा व शत्रुघ्न यांनी राकेश रोशन यांच्या ‘खून भरी मांग’ यांच्या चित्रपटात काम करत होते. त्यांच्या पत्नी पूनम या रेखा यांच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. पण या चित्रीकरणाच्या वेळी शत्रुघ्न व रेखा यांच्यात काही मुद्द्यांवरून मतभेद उडाले होते. तसेच दोघांमध्ये यावरून अनेक अफवा समोर आल्या होत्या. ज्यामुळे हे दोघे तब्बल २० वर्ष एकमेकांशी बोलले नाही.

Tags: bollywoodrekhaRekha touches feet of Shatrughan Sinhashatrughan sinha'sonakshi Sinha
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Garbage Collector Passed 10th Exam
Women

पतीपासून विभक्त, लेकाचा एकटीने सांभाळ अन् …; पुण्यातील कचरा वेचणारी ‘ती’ झाली दहावी पास, प्रेरणादायी संघर्ष

मे 15, 2025 | 2:00 pm
Next Post
Shubhangi Gokhale talks her Saree Collection

स्वतःच्याच साड्यांचा सेल करतात शुभांगी गोखले, किंमत ऐकून तुम्हालाही खरेदी करण्याचा होईल मोह, म्हणाल्या, “सिल्क साड्या...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.