Varsha Usgaonkar cheated in 47 lakh investment scam : मराठी सिनेसृष्टीतील सदाबहार अभिनेत्री वर्ष उसगांवकर यांच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वर्षा उसगांवकर यांच्यासोबत फसवणुकीचा प्रकार घडल्याची धक्क्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वर्षा उसगांवकर, मृणालिनी जांभळे यांच्यासह अनेक अभिनेत्रींची जवळपास 47 लाख रुपयांची फसवणूक झाली असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली, तसेच तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक आणि बांधकाम व्यावसायिक अविनाश जाधव यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
पोलिसांनी तक्रारदार मृणालिनी जांभळे यांची आरोपीशी व्यवसायिकरीत्या ओळख होती. अविनाश जाधव यांनी त्यांना आपण फिल्म प्रोड्यूसर आणि बिल्डर आहोत असे सांगितलेले. अविनाश जाधवने अभिनेत्रीला ऑफर दिली की डोंबिवलीतल्या एका बांधकाम प्रोजेक्टमध्ये जर त्यांनी पैसे गुंतवले तर वर्षभराच्या आत ते मोठ्या परताव्यासह मुद्दल परत देतील. अभिनेत्री या आमिषाला भुलली आणि त्यात पैसे गुंतवले. वर्षा उसगांवकर यांच्याबाबतीतही असेच झाले. (Varsha Usgaonkar cheated in 47 lakh investment scam)
आणखी वाचा – आई-वडिलांकडून छळ, भावाने सगळंच हडपलं अन्…; ‘बिग बॉस १७’ फेम स्पर्धकाची वाईट अवस्था, म्हणाला, “आत्महत्या…”
२०१९ ते २०२० मध्ये मृणालिनी, वर्षा ऊसगांवकर तसेच आणखी तीन जणांनी मिळून चेक आणि ऑनलाइन व्यवहाराद्वारे 47 लाखांची गुंतवणूक केली. ही गुंतवणूक त्यांनी अविनाश जाधवकडे केली. सुरुवातीला परतावा म्हणून त्याने काही रक्कम दिली. परंतु, काही काळानंतर त्यांनी ते बंद केलं. अभिनेत्रींनी त्याला थेट जाब विचारला. यावर अविनाश जाधव यानं अरेरावीची भाषा वापरण्यास सुरुवात केली. (Varsha Usgaonkar cheated in 47 lakh investment scam)
आणखी वाचा – Video : सासूबाईंच्या मार्गदर्शनाखाली मुग्धा वैशंपायनने बनवल्या पुरणपोळ्या, नवऱ्याच्या कमेंटने वेधलं लक्ष
अविनाश जाधव यांनी पैसे परत न देण्याची धमकी दिली, असा आरोप तक्रारदारांनी केला. गुंतवणूक करुन आपली यात फसवणूक झाल्याचं समजताच अभिनेत्रीनं थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. २६ फेब्रुवारी रोजी त्यांनी दादर शिवाजी पार्क पोलीस ठाणे गाठलं. तसेच संशयित आरोपी अविनाश जाधवविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश शेजुळ यांच्याकडून सुरु आहे. (Varsha Usgaonkar cheated in 47 lakh investment scam)





