शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पती मोहन गोखले यांच्या आठवणीत रमल्या शुभांगी गोखले, सांगितला भावनिक प्रसंग

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 2, 2024 | 12:28 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shubhangi Gokhale on his husband addiction recovery.

पती मोहन गोखले यांच्या आठवणीत रमल्या शुभांगी गोखले, सांगितला भावनिक प्रसंग

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. नाटक, चित्रपट व मालिका अशा तीनही माध्यमांतून त्यांनी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. पती मोहन गोखले यांच्या निधनानंतर त्यांनी आई व बाबा अशा दोन्ही भूमिका लीलया पेलत लेक सखी हिचा सांभाळ केला. शुभांगी गोखले व सखी गोखले या दोन्ही मायलेकी त्यांच्या नात्याविषयी आणि मोहन गोखलेंच्या आठवणींविषयी अनेकदा त्यांच्या भावना व्यक्त करत असतात.

अशातच शुभांगी गोखले यांनी नुकत्याच एका मुलाखतीत पती मोहन गोखलेंच्या आठवणीत एक किस्सा शेअर केला आहे. शुभांगी यांनी नुकतीच ‘असोवा’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी शुभांगी गोखले यांना “त्या २५ वर्षांच्या शुभांगी गोखलेला आता काय सांगावंस वाटेल? किंवा तेव्हा एखादी गोष्ट बदलायला पाहिजे असं वाटतं?” असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत शुभांगी यांनी “मोहन गोखलेंच्या व्यसनाला तेव्हा रोखता आलं असतं” असं म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Sakhi Gokhale (@sakheeg)

यावेळी शुभांगी यांनी उत्तर देत असं म्हटलं की, “मला असं वाटतं की, तेव्हाच्या राणीला सगळ्या गोष्टी माहीत होत्या. खूप मौल्यवान आणि सांभाळायला अवघड असणारा असा माणूस तिच्या आयुष्यात होता. तेव्हा मी वयाने लहान होते. त्यामुळे तेव्हा काही गोष्टींचा मला संघर्ष कसा करावा? हे माहीत नव्हतं आणि ते नंतर कळलं. तसंच वयाने लहान असल्याने व तेव्हा मला बायकांना काही गोष्टी rule करता येतात हे माहिती नव्हतं.”

आणखी वाचा – Video : गरोदरपणात बेबी बंप फ्लॉन्ट करतान दिसली दीपिका पदुकोण, अभिनेत्रीच्या लहान केअर टेकरकडे वळल्या सगळ्यांच्या नजरा कारण…

यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “मी खूप घाबरून राहिले किंवा मी त्याच्या (मोहन गोखलेंच्या) अजून मागे लागायला हवं होतं की, त्याचं व्यसन त्याच्या तब्येतीसाठी घातक आहे. मोहन गोखले माणूस सांभाळायला खूपच कठीण होता. पण काहीतरी धाक किंवा अपेक्षा दाखवून मोहनची व्यसनमुक्ती करता आली असती. पण मी तेव्हा घाबरून राहिले आणि मला तेव्हा काही गोष्टींचा अंदाज नव्हता. माझंही त्याच्यावर प्रेम होतं, त्यामुळे त्याला बरं वाटावं असं मी करत गेले.”    

आणखी वाचा –  सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या भाचीची ‘आई कुठे…’ मालिकेमध्ये दमदार एन्ट्री, चिमुकलीला टीव्हीवर पाहून भारावली, म्हणाली, “माझी भाची…”

दरम्यान, अभिनेत्री शुभांगी गोखले या गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत. त्यांनी आजवर अनेक हिंदी व मराठी मालिका आणि चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांच्या ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘काहे दिया परदेस’सारख्या अनेक मालिका गाजल्या. सध्या त्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहेत.

Tags: marathi actressmarathi entertainment newsshubhangi gokhale
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
02 June 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

रविवारी शुभ योग व सूर्यदेवाच्या कृपेमुळे ‘धनु’ राशीसह ‘या’ राशींना होणार आर्थिक लाभ, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.