शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, पोस्ट शेअर करत दिली माहिती, म्हणाल्या, “६० वर्षांचा प्रवास संपला अन्…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 29, 2024 | 11:44 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shubha Khote's husband Dinesh Balsawar passed away

सुप्रसिद्ध अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, पोस्ट शेअर करत दिली माहिती, म्हणाल्या, "६० वर्षांचा प्रवास संपला अन्..."

मराठी मनोरंजन सृष्टीमधून नुकतीच एक दु:खद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शुभा खोटे यांचे पती दिनेश बलसावर यांची काल (२८ मार्च) रोजी रात्री प्राणज्योत मावळली. त्यामुळे आपल्या नवऱ्याच्या निधनाच्या दु:खात अभिनेत्री शुभा यांनी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. शुभा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे काही खास फोटोद्वारे त्यांच्या भावुक आठवणी शेअर केल्या आहेत.

शुभा यांनी त्यांच्या या पोस्टमध्ये आपल्या पतीबरोबरचे अनेक फोटो शेअर केले आहेत आणि त्यांनी हे खास फोटो शेअर करत असं म्हटलं आहे की, “गेली ६० वर्षे आम्ही एकमेकांना एकत्र म्हातारे होऊ. एकत्र जीवन जगू असं म्हटलं होतं. अलविदा, सोबती.” शुभा खोटे यांचे पती हे सुद्धा फिल्म इंडस्ट्रीशी निगडित होते. एक निर्माता म्हणून त्यांनी बराच काळ गाजवला. त्यांनी हिंदीबरोबरच मराठी चित्रपटांचीसुद्धा निर्मिती केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Shubha Khote (@shubhakhote)

आणखी वाचा – आलिशान घर, महागड्या गाड्या अन्…; गोविंदाकडे आहे इतक्या कोटी रुपयांची संपत्ती, शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर कमाई समोर

शुभा खोटे यांचे पती हे सुद्धा सिनेसृष्टीशी निगडित होते. एक निर्माता म्हणून त्यांनी बराच काळ गाजवला. हिंदीबरोबर मराठी चित्रपटांचीसुद्धा त्यांनी निर्मिती केली आहे. १९६७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘चिमुकला पाहुणा’ हा सुद्धा त्यांच्या निर्मितीच्या चित्रपटांमधीलच एक चित्रपट होता. या चित्रपटात शुभा खोटे आणि त्यांचे भाऊ विजू खोटे या भावंडांनी एकत्र काम केले होते.

आणखी वाचा – ‘स्वातंत्र्यवीर सावकर’ चित्रपटासाठी अंकिता लोखंडेने एकही रुपया घेतला नाही, निर्मात्यांनी सांगितले सत्य, म्हणाले, “तिची अट…”

शुभा खोटे यांनी नुकतीच ‘ठिपक्यांची रंगोळी’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. याआधी त्यांनी ‘ससुराल’, ‘देख कबीरा रोया’, ‘संजोग’, ‘बरखा’, ‘ग्रहस्ती’, ‘छोटी बहन’ यांसारख्या अनेक हिंदी व मराठी चित्रपटांत काम करून आपली ओळख निर्माण केली आहे. दरम्यान, १९६४ मध्ये शुभा यांचे दिनेश यांच्याबरोबर लग्न झाले होते. त्यांना भावना बलसावर आणि अश्विन बलसावर ही दोन मुलं आहेत.

Tags: Shubha KhoteShubha Khote husband passes awayशुभा खोटेशुभा खोटे पती निधन
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
Shivani rangole shared her fan moment of Ramai's role from dr. babasaheb ambedkar serial

…आणि डॉ. बाबासाहेब आंबडेकरांची पत्नी समजून शिवानी रांगोळेचे 'त्या' कुटुंबाने धरले पाय, अभिनेत्रीने सांगितला प्रसंग, म्हणाली, "रमाबाईंविषयी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.