“पुष्पा” या सिनेमाने साऊथ इंडियन फिल्मइंडस्ट्री मध्येच नाही तर हिंदी चित्रपट सृष्टीत देखील धुमाकूळ घातला. हा सिनेमा प्रदर्शित झाल्या नंतर प्रेक्षकांनी या सिनेमाला अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं. सिनेमा प्रदर्शित झाल्यांनतर पुष्पा सिनेमातील “मै झुकेगा नाही साला” हा डायलॉग सगळ्यांच्या तोंडावर राहिला. (pushpa Two Trailer)
पुष्पा सिनेमाचे हिंदी डबिंग अभिनेता श्रेयस तळपदेने केलं होतं. पुष्पा नंतर प्रेक्षक पुष्पा २ ची आतुरतेने वाट बघत होते. नुकताच पुष्पा २ या सिनेमाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून श्रेयसने हा टिझर त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
हे देखील वाचा: “प्रत्येक स्त्रीनं वेळीच आपल्या आयुष्याचं स्टेअरिंग..”,अरुंधतीचा स्त्रियांना मोलाचा सल्ला
काल अल्लुअर्जुन याचा वाढदिवस होता. या निमित्ताने श्रेयसने पुष्पा २ चा टिझर शेअर करत कॅप्शनमध्ये अल्लुअर्जुन ला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्रेयसने या व्हिडियोला “अब रुल पुष्पा का और पुष्पा कभी झुकेगा नाही झाला” असे कॅप्शन दिले आहे. याच बरोबर या ट्रेलर प्रमाणे तुमचा दिवस देखील रॉकिंग जावो असं त्याने म्हंटल आहे. पुढे त्यांनी सांगितलंय पुष्पाच्या डबिंग वेळेस आलेला अनुभव काही वेगळाच होता. ती राईड आता मोठी झाली आहे. तर आता पुष्पा २ या सिनेमाचे हिंदी डबिंग सुद्धा श्रेयस करणार यात काही शंका नाही. (pushpa Two Trailer)

हे देखील वाचा: ‘डिनर, ड्रिंक्स अँड म्युझिक’, आदिश आणि रेवतीच्या डिनरडेटची चर्चा
पुष्पा हा सिनेमा पुष्पा राज नावाच्या एका सम्गलर ची आहे. या मध्ये असलेले पात्र रक्त चंदनाची तस्करी करत असतो. त्याच गावामध्ये त्याचे अनेक दुश्मन सुद्धा असतात ज्यांना पुष्पाला संपवायचं असतं. त्यासाठी ते प्रयत्न देखील करतात पण त्यांना हे शक्य होतं नाही. या उलट पुष्पा त्याच एरियाचा मोठा डॉन होतो. त्यातील एक गूंड त्याच्या प्रियसीला आपलं बनवण्याचा प्रयत्न करत असतो पण पुष्पा ते होऊ देत नाही, पुष्पा मारामारी करून आल्यानंतर तो त्याची प्रियसी श्रीवल्ली सोबत लग्न करतो. या चित्रपटाच्या शेवटी पुष्पाला अटक होते परंतु तो त्या जेल मधून पळून जातो. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी पुष्पा २ हा चित्रपट कधी येतोय याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.