आई कुठे काय करते ही मालिका सध्या टीआरपीमध्ये अव्व्ल स्थानावर असून या मलाईकेत सध्या एक रंजक ट्रक पाहायला मिळतोय.ईशाने पळून जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे देशमुख आणि केळकर या दोन्ही कुटुंबात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. ईशा ही सध्या टोकाचे निर्णय घेत आहेत, पण तिच्या या जिद्दीपणामुळे अखेर अनिश आणि ईशाचा साखरपुडा होणार आहे. असं नुकतंच समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय.(Isha Engagement)
नुकताच प्रसारित झालेल्या प्रोमोमध्ये,संजना आणि अनघा या ईशाला आता तुमचा साखरपुडा करायचा आहे.सगळे तयार झालेत असं सांगतात. तर दुसरीकडे अरुंधती ही अनिशसोबत तू माझ्या मुलीला सांभाळशील ना? ती थोडी तापट आहे असं म्हणते. तर आता खरंच अनिश-ईशा एकत्र येणार आणि त्यांचा साखरपुडा पार पडणार का? हे जाणून घेण्यासाठी चाहते आता उत्सुक झालेत.
तर आजच्या भागात ईशा पळून गेल्याने तिचा सर्वजण शोध घेत असतात. आपण पळून जाऊ लग्न करू या निर्णयावर ती ठाम असते .यासोबतच हा निर्णय ती अनिशवर लादण्याचा प्रयत्न करतेय.पण अनिश तिची समजूत काढतो. ती ऐकतच नाही तेव्हा, अनिश तिला पाणी आण्यासाठी जातो आणि यशला कॉल करून बोलावतो.हे ईशा ऐकते आणि चिडते, गौरी यशाच्या नात्याची ती स्वतःच्या नात्याशी तुलना करते.आणि अनिश मला फसवतोय असा विचार करते.अरुंधती आणि सर्वजण त्या ठिकाणी पोहचतात आणि त्यांनतर सर्वजण ईशाची समजूत काढतात, तिला घरी घेऊन जातात,देशमुखांच्या घरी अनिरुद्ध चिडतो.अनिश मला आवडत नाही असं म्हणत, तो ईशा आणि अनिशच्या नात्याला विरोध करतो.(Isha Engagement)
हे देखील वाचा: अभिनेता हृषीकेश शेलारच्या मुलीचा नामकरण सोहळा संपन्न, हृषीकेश ने शेअर केलेले सुंदर फोटोज पाहा
तर आता नुकतंच समोर आलेल्या प्रोमोमध्ये त्यांचा साखरपुडा ठरणार असल्याचं दिसतंय. तर आता अनिरुद्ध हा कसा ईशा अनिशच्या लग्नासाठी तयार होणार तसेच आई लेकीची सून होणार का? हे पाहणं रंजक असेल.