सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाच्या ९व्या वाढदिवसानिमित्त नवऱ्याने श्रेया बुगडेसाठी बूक केली खास बोट, रोमँटिक फोटो समोर, म्हणाली, “सगळ्यात सुंदर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 27, 2023 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shreya Bugde Marriage Anniversary

लग्नाच्या ९व्या वाढदिवसानिमित्त नवऱ्याने श्रेया बुगडेसाठी बूक केली खास बोट, रोमँटिक फोटो समोर, म्हणाली, "सगळ्यात सुंदर..."

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे. या कार्यक्रमातून श्रेया घराघरांत पोहोचली. या कार्यक्रमातील तिचा अभिनय व विनोदी स्किट्स प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडले. श्रेयाने तिच्या अभिनयाच्या जोरावर खूप मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. सोशल मीडियावरुनही श्रेया नेहमीच काही ना काही शेअर करुन चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच श्रेयाच्या सोशल मीडियावरील एका रोमँटीक पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Shreya Bugde Marriage Anniversary)

श्रेयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिच्या लग्नाच्या नवव्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये श्रेयाने तिच्या नवऱ्याबरोबरचे रोमँटीक फोटो शेअर केले आहेत. श्रेयाने व तिच्या पत्नीने त्यांचा लग्नाचा वाढदिवस yacht मध्ये साजरा केला. त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. श्रेयाने दिलेल्या कॅप्शनवरुन हे खास सरप्राईज श्रेयाला तिच्या नवऱ्याने दिलं असल्याचं तिने म्हटलं आहे. श्रेयाच्या या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींसह त्यांच्या चाहत्यांनीही लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – “बोलणं होत नाही म्हणून…”, लेक सासरी गेल्यानंतर अरुण कदम यांना नातवाची येत आहे आठवण, म्हणाले, “मी व माझी बायको…”

श्रेयाच्या व्यावसायिक आयुष्याबाबत सर्वांनाच माहित आहे. मात्र अभिनेत्रीच्या खाजगी आयुष्याबाबत व लव्हलाईफबाबत फारच कमी लोकांना माहित असावं. श्रेयाने निर्माता निखिल सेठसोबत लग्नगाठ बांधत संसार थाटला आहे. या दोघांची पहिली भेट एका मालिकेच्या सेटवर झाली होती. त्यावेळी निखिलला पाहताच क्षणी श्रेया आवडली होती. परंतु श्रेयाकडून असं काही अजिबात नव्हतं. निखिल सेटवर सतत श्रेयाबरोबर मैत्री करण्याचा प्रयत्न करत होता. अशातच या दोघांमध्ये एका कारणावरुन खटकलं आणि त्यामुळे दोघांचं थोडंफार बोलणं होतं तेही बंद झालं.

View this post on Instagram

A post shared by Shreya Bugde Sheth???? (@shreyabugde)

आणखी वाचा – “वेदना, झोप नाही अन्…”, गरोदरपणानंतर सई लोकूरची झाली आहे अशी अवस्था, म्हणाली, “घाण डायपर…”

पुढे काही दिवसांनी एका मालिकेच्या टायटलवर निर्माता म्हणून निखिलचं नाव पाहिल्यानंतर श्रेयाने त्याला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांचं पुन्हा बोलणं सुरु झालं. याकाळात निखिलच्या घरी त्याच्या लग्नाची बोलणी सुरु होती. योग्य वेळ साधत निखिलने श्रेयाला प्रपोज केलं. श्रेयानेसुद्धा त्याला होकार दिला. पुढे २०१५ मध्ये ही जोडी विवाहबंधनात अडकली.

Tags: marathi actressmarathi serialshreya bugdeshreya bugde husbandshreya bugde marriage anniversary
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Hemant Dhome New Movie

'झिम्मा २'नंतर हेमंत ढोमेच्या नव्या चित्रपटाची घोषणा, स्वतःचं केला खुलासा, म्हणाला, "सिद्धार्थ, निर्मिती सावंत आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.