सिनेसृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अशातच हिंदी टेलिव्हिजन जगतातील लोकप्रिय अभिनेत्रीही लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. टेलिव्हिजन अभिनेत्री श्रेनू पारीख लवकरच बोहोल्यावर चढणार असल्याचं समोर आलं आहे. श्रेनू पारीख तिचा प्रियकर अक्षय म्हात्रेसह विवाहबंधनात अडकणार आहे. दोघांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या लग्नाआधीच्या विधींचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. (Shrenu Parikh Akshay Mhatre Wedding)
टीव्ही अभिनेत्री श्रेनू पारीख तिचा प्रियकर अक्षय म्हात्रेसह लग्न करण्याच्या तयारीत आहे. १८ डिसेंबर पासून दोघांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली. पारीखने तिच्या मेहंदी समारंभातील फोटो शेअर केले. यांत तिने हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले होते. श्रेनू पारीखने तिच्या मेहेंदी समारंभातील फोटो शेअर केले आहेत. समोर आलेल्या फोटोंमध्ये ‘इस प्यार को क्या नाम दूं २’ फेम अभिनेत्रीने हिरव्या रंगाचा इंडो-वेस्टर्न लेहेंगा टियारा, फुलांचे दागिने व कपड्यांना साजेसे कानातले घातलेले पाहायला मिळाले.
‘इश्कबाज’ फेम अभिनेत्री तिच्या लग्नाच्या तयारीसाठी उत्सुक असलेली पाहायला मिळत आहे. अभिनेत्रींचे संगीत रिहर्सलचे ही अनेक व्हिडीओ समोर आले. त्यानंतर आता या दोघांच्या लग्नाकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, यांत अभिनेत्री हळदी लूकमध्ये पतीसह बाईकवरून येताना दिसत आहे. श्रेनूने ‘इस प्यार को क्या नाम दूं- एक बार फिर’, ‘एक भरम सर्वगुण संपन’, इश्कबाज’ आणि ‘घर एक मंदिर’ यासह अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. अभिनेत्रीने २०१० मध्ये ‘जिंदगी का हर रंग…गुलाल’ या मालिकेतून टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केले.
दुसरीकडे अक्षय, लोकप्रिय टेलिव्हिजन मालिका ‘पिया अलबेला’ मधील नरेन व्यासच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. श्रेणू व अक्षय यांची भेट २०२१मध्ये ‘घर एक मंदिर’ मालिकेच्या सेटवर झाली. सुरुवातीला त्यांच्यात मैत्री झाली आणि त्यानंतर या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.