छोट्या पडद्यावरील ‘देवयानी’ ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेमुळे अभिनेत्री शिवानी सुर्वेला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या मालिकेमुळे शिवानी घराघरांत पोहोचली. तसेच ‘बिग बॉस मराठी’ या शोमुळे तर तिला खूपच लोकप्रियता मिळाली. छोट्या पडद्यावरील मालिका व टीव्ही शो करत करत ती हळूहळू मोठ्या पडद्याकडे वळली. ‘सातारचा सलमान’, ‘ट्रिपल सीट’, ‘वाळवी’ अशा अनेक चित्रपटांततून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तिचे वाळवी व झिम्मा २ हे चित्रपट चांगलेच गाजले. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा २’ या चित्रपटामुळे तर ती अधिकच चर्चेत आली आहे. या चित्रपटातील तिची भूमिका चाहत्यांना आवडली असून या चित्रपटालाही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. (Shivani Surve On Instagram)
शिवानी सोशल मीडियावरदेखील चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच तिने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शिवानीने नुकताच इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला असून तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अल्पवधीतच या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
आणखी वाचा – “मला पॉर्न बघायला आवडतं…”, ‘अॅनिमल’ला उद्देशून अर्शद वारसीचं मोठं वक्तव्य, म्हणाला “मला ते करायला…”
शिवानीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती साडी खरेदी करत असल्याचे दिसत आहे. “या आठवड्यात माझ्या आईला मी हा व्हिडीओ पाठवला” असं म्हणत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच “काहीतरी खास” व “२०२४” असे हॅशटॅगदेखील लिहिले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे. अनेकांनी या व्हिडीओखाली कमेंट करत तिला लग्न करत आहे का? असे विचारले आहे. शिवानीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक कलाकारांनीदेखील कमेंट्सद्वारे प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रार्थना बेहेरे, ऋतुजा बागवे यांसह बॉयफ्रेंड अजिंक्य ननावरे यानेही या व्हिडीओवर कमेंट केली आहे. अजिंक्यने या व्हिडीओखाली स्माईलीचे इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये या व्हिडीओविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
आणखी वाचा – ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीचे चित्रपटात पदार्पण, लवकरच झळकणार मोठ्या पडदयावर, फोटो शेअर करत म्हणाली…
दरम्यान, शिवानी ही अभिनेता अजिंक्य ननावरेला डेट करत आहे. ‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेच्या सेटवर त्यांच्यात मैत्री झाली. पुढे दोघांच्या मैत्रीचं रुपांत प्रेमात झालं. २०१७ पासून शिवानी-अजिंक्य हे एकत्र राहत आहेत. त्यामुळे ही जोडी लग्न कधी करणार? या विषयी चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. या उत्सुकतेपोटी अनेकांनी “तुम्ही दोघं लग्न करणार आहात का? , तुमचं लग्न आहे का? , लग्नसराई, आतुरता” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत