Dunki vs Salaar : वर्षाअखेरीस पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर दोन बिग बजेट चित्रपटांची जोरदार टक्कर होणार आहे. शाहरुख खानचा ‘डंकी’ आणि प्रभासचा ‘सालार’ एकाच दिवसाच्या अंतराने प्रदर्शित होणार आहेत. या दोन्ही चित्रपटांची क्रेझ चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. याचबरोबर ‘डंकी’ व ‘सालार’ चित्रपटांचे प्रचंड आगाऊ बुकिंगही होत आहे. या सगळ्यात ट्रेड एनालिस्ट यांनी चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे. व्यापार विश्लेषकांच्या मते कोणता चित्रपट पहिल्या दिवशी कमाईचे रेकॉर्ड मोडू शकतो हे नुकतेच समोर आले आहे.
‘डंकी’ व ‘सालार’साठी चित्रपट प्रदर्शनापूर्वीच आगाऊ बुकिंग सुरु झाले आहे. ‘Sacknilk ‘ च्या अहवालानुसार, पहिल्या दिवशी आतापर्यंत ‘डंकी’ चित्रपटाची तीन लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. चित्रपट प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने तब्बल १० कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. त्याचबरोबर प्रशांत नीलच्या ‘सालार’ चित्रपटाची सहा लाखांहून अधिक तिकिटे विकली असून १४ कोटींहून अधिक कमाई केली आहे. ऍडव्हान्स बुकिंगमध्ये प्रभासचा ‘सालार’ शाहरुखच्या ‘डंकी’पेक्षा खूप पुढे आहे.
दोन चित्रपटात बॉलीवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, ट्रेड एनालिस्ट अतुल मोहन यांनी सांगितले की, “’डंकी’ चित्रपटाची ओपनिंग ५० कोटी रुपये असू शकते”. ते पुढे म्हणाले, “अॅडव्हान्स बुकिंगचा ट्रेंड चांगला आहे. शाहरुख खान मुख्य भूमिकेत असून त्याशिवाय राजकुमार हिरानी दिग्दर्शक आहेत. तर ‘सालार’ चित्रपटात ऍक्शनचा भरणा असल्याने या चित्रपटाला साऊथला भरघोस प्रतिसाद मिळेल.
हिंदुस्थानच्या रिपोर्टनुसार, ट्रेड एनालिस्ट गिरीश जोहर म्हणाले, “शाहरुख खानच्या ‘डंकी’ आणि प्रभासच्या ‘सालार’ या दोन्ही चित्रपटांचे फॅन फॉलोइंग प्रचंड आहे. या चित्रपटांची चांगली गोष्ट म्हणजे दोन्ही चित्रपटांचे प्रेक्षक व भौगोलिक क्षेत्र वेगळे आहेत. ‘सालार’मध्ये मोठ्या प्रमाणात ऍक्शन आहे त्यामुळे या चित्रपटाला दक्षिणेत खूप पसंती मिळेल अशी अपेक्षा आहे. तर दुसरीकडे ‘डंकी’ हा चित्रपट मेट्रो अर्बनमध्ये लोकप्रिय ठरेल.