शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्याच्या विवाहबाह्य…”, शोएब मलिकच्या सानिया मिर्झाबरोबरच्या नात्यावर बहिणीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “म्हणून तिने घटस्फोट…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 21, 2024 | 6:36 pm
in Trending
Reading Time: 2 mins read
google-news
Shoaib maliks sister alleges sania mirza was tired of his extramarital affairs see the details

“त्याच्या विवाहबाह्य...”, शोएब मलिकच्या सानिया मिर्झाबरोबरच्या नात्यावर बहिणीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “म्हणून तिने घटस्फोट...”

पाकिस्तानचा क्रिकेट स्टार शोएब मलिकने प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदबरोबर लग्न केले आहे.  सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे फोटो व्हायरल होताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. शोएबने स्वत: सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे म्हणजेच निकाहचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सानिया मिर्झा व तिचा पती शोएब मलिक यांच्यात घटस्फोट झाल्याच्या अनेक अफवा पसरल्या होत्या. अशातच आता शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नाच्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.

शोएब व सना यांच्या लग्नावर सानियाचे वडील इम्रान मिर्झा यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सानियाने शोएबला खुला घटस्फोट दिला असल्याचे म्हटले.  मुस्लिम महिलांच्या अधिकारांनुसार खुला म्हणजे मुस्लिम महिला तिच्या पतीला स्वतःच घटस्फोट देते. अशातच आता शोएबच्या बहिणीने त्याच्या लग्नाविषयी एक खुलासा केला आहे. ‘द पाकिस्तान डेली’च्या वृत्ताप्रमाणे, सानियाने शोएबबरोबर घटस्फोट घेतल्याचे सांगितले आहे. 

View this post on Instagram

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

हेही वाचा – बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रनौत रामजन्मभूमीत दाखल, अयोध्येत पोहोचताच पार पाडले होमहवन व पूजा, नंतर झाडूही मारला

सानिया शोएबच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळली होती. त्यामुळे तिने त्याला घटस्फोट दिला असल्याचा खुलासा स्वत: शोएबच्या बहिणीने केला आहे. दरम्यान, शोएब व सनाच्या लग्नात शोएबच्या कुटुंबातील एकाही सदस्याने सहभाग घेतला नसल्याचे पाहायला मिळाले होते. अशातच आता बहिणीने शोएब व सानियाच्या नात्याबद्दल केलेल्या खुलासामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

हेही वाचा – Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’मधून बाहेर पडताच आयेशा खानची पहिली प्रतिक्रिया, पोस्ट शेअर करत मुन्नवरवर साधला निशाणा, म्हणाली “पिक्चर अजून…”

दरम्यान, सानिया मिर्झा व शोएब मलिक हे गेल्या काही महिन्यांपासून एकत्र दिसत नव्हते. त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल अनेकदा अफवा पसरल्या होत्या. शोएब व सानियाला पाच वर्षांचा मुलगाही आहे जो सानियाबरोबर राहतो. तर शोएबने लग्न केलेली २८ वर्षीय सना जावेद ही पाकिस्तानच्या अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे, तिच्या नावे ‘ए मुश्त-ए-खाक’, ‘डंक’ यांसारखे अनेक प्रसिद्ध शो आहेत. याशिवाय ती अनेक गाण्यांमध्येही झळकली आहे. 

Tags: Bollywood entertainmentBollywood entertainment newsentertainment newsSania Mirzashoaib malikshoaib malik marriageबॉलिवूड मनोरंजनबॉलिवूड मनोरंजन बातमीमनोरंजन बातमीशोएब मलिकशोएब मलिक विवाहसानिया मिर्झा
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Shriya Pilgaonkar Shares Childhood Incident

"मराठी वाचता येत नाही अन्…", सुप्रिया पिळगांवकरांनी घेतला होता लेकीसाठी मोठा निर्णय, श्रियाने स्वतःच सांगितला किस्सा, म्हणाली, "शाळा बदलण्याचा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.