शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“प्राजक्ताची पत्रकार परिषद राजकीय हेतु”, सुषमा अंधारेंचा प्राजक्ता माळीवर राग, म्हणाल्या, “करुणा यांच्यावर का नाही बोलली? आणि…”

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 30, 2024 | 2:08 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
sushma andhare on prajkata mali

सुषमा अंधारे यांचे प्राजक्ता माळीबद्दलचे वक्तव्य चर्चेत

सध्या सोशल मीडियावर सर्वत्र मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नावाची चर्चा सुरु आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बोलताना सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नावाचा उल्लेख केला. यामुळे एक वेगळा वाददेखील निर्माण झाला आहे. या सगळ्या संतापलेल्या प्राजक्ताने पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांच्या विरोधात निषेध व्यक्त केला. प्राजक्ताने महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. तसेच तिने या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तसेच  सुरेश धस यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करावी असे निवेदनही केले. अशातच आता या सगळ्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य केले आहे. (sushma andhare on prajkata mali)

प्राजक्ताने राजकारणासाठी महिला कलाकारांच्या नावाचा गैरवापर होता कामा नये, तसेच सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे. दरम्यान याबद्दल आता सुषमा यांनी या प्रकरणी ‘एबीपी माझा’ शी संवाद साधताना प्राजक्ताने केलेल्या पत्रकार परिषदेवर प्रश्न उपस्थित केला आहे. सुषमा म्हणाल्या की, “सत्याला स्पष्टीकरणाची गरज नसते. प्राजक्ता माळीने घेतलेली पत्रकार परिषद मला पटली नाही. प्राजक्ताने पत्रकार परिषद का घ्यावी?, कोणाला सांगायचे आहे?, मित्र स्पष्टीकरण मागत नाही आणि शत्रू त्यावर विश्वास ठेवत नाही. त्यामुळे विषय सोडून द्यायला हवा होता. पृथ्वीचा आकार केवढा? तर ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा असं म्हणा आणि सोडून द्या”.

आणखी वाचा – Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची लगीनघाई!, लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, पारंपरिक लूकमध्ये नटली नवरी

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

पुढे त्या म्हणाल्या की, “या सगळ्याचे तुम्हाला स्पष्टीकरण का द्यावेसे वाटते.सुरेश यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देण्यापेक्षा दीड महिन्याआधी जे करुणा मुंडे आक्षेपार्ह बोलल्या त्यावर आक्षेप का नाही घेतला? त्यावेळी प्राजक्ताने पत्रकार परिषद घेतली नाही. त्यावेळी त्यांनी दुर्लक्ष का केलं? आतादेखील त्या दुर्लक्ष करु शकल्या असत्या. आता त्यांनी पत्रकार परिषद घेणं राजकीय हेतु असल्यासारखे वाटत आहे. सुषमा अंधारेंच्या विरोधात जेव्हा बोललं गेलं तेव्हा का नाही सुचलं? सुरेश धस यांच्याविषयी जी आगपाखड होत आहे ते कोणत्या पक्षाचे आहेत? सुरेश हे भाजपचे नेते आहेत. भाजपची संस्था आरएसएस आहे”.

आणखी वाचा – Video : सोनाक्षी सिन्हाच्या खोलीबाहेर चक्क सिंहाने फोडली डरकाळी, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आमचा गजर…”

पुढे त्या म्हणाल्या की, “प्राजक्ता माली आरएसएसच्या मुख्यालायात जातात तेव्हा त्या कलाकार राहत नाहीत. कारण त्यांचा स्वतःचा एक पॉलिटिकल स्टँड तयार होतो. त्यांचा एक वेगळा राजकीय दृष्टीकोण तयार होतो”. असं त्या म्हणाल्या. दरम्यान आता सुषमा अंधारे यांच्या व्यक्तव्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

Tags: prajakata malistatementsushma andhare
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
gal gadot surgery

गरोदरपणाच्या आठव्या महिन्यात सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर शस्त्रक्रिया, मेंदूमध्ये रक्ताची गाठ असल्याचे निदान, आता अशी परिस्थिती की…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.