Shivani Sonar & Ambar Ganpule Wedding : मराठी कलाविश्वात गेल्या काही दिवसांपासून शिवानी सोनार आणि अंबर गणपुळे यांची लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच ‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमने या दोघांचं केळवण केलं होतं जे प्रचंड चर्चेत राहिलं. यानंतर या दोघांच्या घरी आता लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचं समोर आलं आहे. कालच शिवानी व अंबर यांच्या संगीत सोहळ्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना पाहायला मिळाले. त्यांच्या संगीत सोहळ्याच्या व्हिडीओने अक्षरशः धुमाकूळ घातला. तर त्यापूर्वी अंबरच्या हळदी सोहळ्यातील फोटो समोर आले. अंबरच्या पाठोपाठ आता शिवानीला हळद लागली असल्याचं समोर आलं आहे. शिवणीच्या हळदीचे खास फोटो नुकतेच समोर आले आहेत.
शिवानी व अंबर हे दोघंही मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखले जातात. आजवर दोघांनीही अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. अखेर आता ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. त्यापूर्वी शिवानीला अंबरच्या नावाची हळद लागली असल्याचं समोर आलं आहे. हळदीसाठीच्या शिवानीच्या साध्या लूकनेही साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. हळदीसाठी शिवानीने खास पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे. आणि त्यावर पिवळ्या फुलांचे पॅच पाहायला मिळत आहेत. नाजूक व सुंदर ज्वेलरी परिधान करण्याला तिने प्राधान्य दिलं आहे.

शिवानीच्या हळदी समारंभातील साधा लूक साऱ्यांच्या पसंतीस पडला आहे. दोघांनी गेल्यावर्षी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. यानंतर चाहते या दोघांच्या लग्नसोहळ्याची आतुरतेने वाट पाहत होते. आता त्यांच्या लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. सुरुवातीला शिवानीच्या ग्रहमख विधीचे फोटो समोर आले. त्यानंतर तिच्या मेहंदी समारंभाचे फोटोही समोर आले. या मेहंदी सोहळ्यात अंबर व शिवानीने Twinning केल्याचं पाहायला मिळालं.
आणखी वाचा – Chhaava Movie : विकी कौशलचे ‘छावा’मधील रौद्र रुप समोर, लूकने वेधलं लक्ष, प्रेक्षकांना ट्रेलरची प्रतिक्षा
अंबर व शिवानी येत्या २१ जानेवारीला विवाहबंधनात अडकणार आहेत. अभिनेत्रीने तिच्या लग्नपत्रिकेची पहिली झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यावर शिवानी व अंबर या दोघांच्या नावाची फोड करुन ‘#Ambani’ हा हॅशटॅग सुद्धा वापरण्यात आला आहे. दोघांनीही आजवर अनेक मराठी मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.