बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही नेहमी चर्चेत असलेली बघायला मिळते. सध्या ती बॉलिवूडपासून दूर आहे. मात्र ती अनेकदा भारतात येत असते. सध्या ती महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने भारतात आली आहे. १४४ वर्षांनी आलेल्या या महाकुंभला भाविकांनी कोट्यावधी संख्येने गर्दी केली आहे. १३ जानेवारी रोजी सुरु झालेला हा महाकुंभ मेळा सुरु झाला आहे. हा मेळा २५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सुरु राहणार आहे. भारत तसेच जगभरातून अनेक भाविक येथे पवित्र स्नान करण्यासाठी येत आहेत. अशातच आता प्रियांका चोप्रा देखील महाकुंभमध्ये दाखल झाली आहे. याबद्दलची माहिती तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. (priyanaka chopra at mahakumbh 2025)
प्रियांका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर प्रयागराज येथील एक फोटो शेअर केला आहे. हा व्हिडीओ बघून अभिनेत्री महाकुंभसाठी जात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अभिनेत्रीने हा व्हिडीओ कारमध्ये बसून शूट केल्याचे दिसून येत आहे. यामध्ये शहराची झलकदेखील बघायला मिळत आहे. त्यामुळे आता प्रियांका महाकुंभमध्ये खरच दाखल होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

प्रियांका अनेकदा धर्माबाबत जागरूक असते. परदेशात राहूनदेखील ती भारतीय सण आनंदाने साजरे करताना दिसते. याआधीही ती भारतात आयोध्या येथे श्रीराममंदिरात आली होती. नवरा निक जोनास व मुलगी मालतीदेखील तिच्याबरोबर होते. यावेळी तिने सहकुटुंब श्रीरामाचे दर्शन घेतले होते. त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले बघायला मिळाले.
प्रियांकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर सध्या ती सध्या हॉलिवूड सीरिजमध्ये तसेच चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती बॉलिवूडमध्ये काम करताना दिसली नाही. २०१६ साली तिचा ‘स्काय इज पिंक’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात तिच्याबरोबर फरहान अख्तर व जायरा वसिम हे कलाकार दिसून आले होते. लवकरच ती ‘द ब्लफ’, ‘सिटाडेल सीजन २’ व ‘जोनस ब्रदर्स यांच्याबरोबर एका चित्रपटात दिसून येणार आहे.