‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘शिवा’ या मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळणं आलेली पाहायला मिळाली. मालिकेत आलेल्या या रंजक वळणांमुळे मालिकेचा प्रेक्षकवर्गही वाढलेला पाहायला मिळाला. मालिकेत सध्या शिवा व आशुतोष यांचं लग्न झालेलं पाहायला मिळत आहे. लग्नानंतर शिवाच्या आयुष्यात अचानक बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. रावडी, बिनधास्त, न घाबरणाऱ्या शिवाला अचानक शांत, संयमी, रडूबाई पाहून धक्काचं बसला आहे. (Purva Phadke Post)
मालिकेतील शिवा व आशू यांची केमिस्ट्री चाहत्यांना विशेष आवडत आहे. नुकतच मालिकेत दिव्या पळून गेल्याने आता आशुबरोबर शिवाचे लग्न होत असल्याचा ट्विस्ट पाहायला मिळाला. यामुळे शिवा व आशू यांच्या मैत्रीत दुरावा आल्याचे पाहायला मिळत आहे. आता दोघांचेही लग्न झाले असून त्यांनी त्यांच्या संसाराला सुरुवात केली आहे. मालिकेत शिवा हे पात्र अभिनेत्री पूर्वा फडके साकारत आहे. तर आशुच्या भूमिकेत शाल्व किंजवडेकर दिसत आहे.
पूर्वा नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. ‘शिवा’ या मालिकेत येण्यापूर्वी पूर्वा खूप वेगळी दिसायची. मात्र मालिकेत आता पूर्वाचा लूक बदलला आहे. सोशल मीडियावरही पूर्वा बर्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच पूर्वाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
आणखी वाचा – Video : आजारी असूनही सीन शूट करत आहे लीला, हातात छोटा पंखा घेऊन बसली आणि…; bts व्हायरल
पूर्वाने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये ती बाईक चालवताना दिसत आहे. शिवाने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये ती शाल्वच्या बाईकवर बसली आहे. साडी नेसून शिवाने बाईकवर बसून काढलेल्या फोटोची चर्चा झाली आहे. या फोटोवर शाल्वने कमेंट करत, “छान मस्त. स्टॅन्ड वरुन का नाही काढली?”, असं म्हणत तिची खिल्ली उडवली आहे. शिवा व आशु यांची मालिकेतही जुगलबंदी पाहायला मिळते. आता आशु शिवाबरोबरचं नातं केव्हा स्वीकारणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.