बुधवार, सप्टेंबर 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“दोघांनी अचानक लग्न…”, सोनाक्षी सिन्हा व जहीर इक्बालच्या लग्नावर मुकेश खन्ना यांचे भाष्य, म्हणाले, “लव्ह जिहाद तर…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 6, 2024 | 12:09 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
mukesh khanna on sonakshi sinha and zaheer iqbal wedding

"दोघांनी अचानक लग्न...”, सोनाक्षी सिन्हा व जहीर इक्बालच्या लग्नावर मुकेश खन्ना यांचे भाष्य, म्हणाले, “लव्ह जिहाद तर...”

 अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही बॉलीवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिच्या अभिनयाची चर्चादेखील मोठ्या प्रमाणात झाली. २०१० साली तिने ‘दबंग’ या चित्रपटातून मनोरंजनसृष्टीमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये दिसून आली. गेल्या अनेक महिन्यांपासून तिच्या बॉयफ्रेंडबरोबरच्या चर्चा सुरु होत्या. यावरुन ती चर्चेतदेखील आली होती. ती बॉयफ्रेंड जहीर इक्बालबरोबर लग्नबंधनात अडकली. मात्र यावरुन ती ट्रोल झाली तसेच तिच्या लग्नावरुन चर्चादेखील झाली. (mukesh khanna on sonakshi sinha and zaheer iqbal wedding)

सोनाक्षी सिन्हा २३ जून रोजी जहीरबरोबर लग्नबंधनात अडकली. त्यानंतर ती पतीबरोबर हनिमूनला गेली. तिने हनिमूनच्या दरम्यानचे काही रोमॅंटिक फोटोदेखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.  तिच्या या फोटोंना चाहत्यांनी खूप पसंतीही दर्शवली आहे. सोनाक्षी पतीबरोबर खुश असली तरीही तिच्या लग्नाच्या चर्चा अजूनही थांबायचे नाव घेत नाहीत. तिच्या लग्नाला अजूनही हिंदू-मुस्लिम लग्न, लव्ह जिहाद अशी नावं दिली जात आहेत. या चर्चावरुन तिला अनेक कलाकारांनी पाठिंबाही दिला. आता या मुद्द्यावर ‘शक्तिमान’ फेम अभिनेते मुकेश खन्ना यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा – अर्जुन-पूर्णा आजीमधील अबोला संपला, सुभेदार कुटुंबाची सायलीवर मोठी जबाबदारी, नातसून म्हणून कर्तव्य पार पाडेल का?

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

मुकेश यांनी नुकतीच ‘द फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी सोनाक्षी व झहीर यांच्या लग्नावर भाष्य करत म्हणाले की, “त्या दोघांनी अचानक लग्न केले नाही. लग्नाआधी त्यांनी सहा-सात वर्ष एकमेकांना डेट केले. एकमेकांच्या सहवासात राहिले, ओळखलं आणि मगच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला”.

आणखी वाचा – नाटकाच्या दौऱ्यानिमित्त बाहेर असलेल्या संकर्षण कऱ्हाडेला येत आहे मुलांची आठवण, पोस्ट शेअर करत म्हणाला, “सकाळ झाली आणि…”

पुढे ते म्हणाले की, “सोनाक्षी व झहीर यांचं लग्न लव्ह जिहाद असल्याचं म्हंटलं जात आहे. पण लव्ह जिहाद तेव्हाच होतो जेव्हा एखाद्या मुलीचं जबरदस्तीने लग्न लावून दिले जाते. हिंदू-मुसलमान लग्न करु शकत नाहीत का? आमच्या वेळीदेखी अनेक लोकांनी असे केले आहे. तो त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे”.

सोनाक्षी व झहीर यांनी नोंदणी पद्धतीने आणि जवळचे मित्र व नातेवाईक यांच्या उपस्थितीत मुंबई येथे लग्न केले. त्यानंतर त्यांनी ग्रँड रिसेप्शनदेखील केले. या सोहळ्यासाठी बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

Tags: mukesh khannasonakshi SinhaweddingZaheer Iqbal
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
Justin Bieber return to america

Video : अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यात जस्टीन बीबरची हवा, 'त्या' कृतीची रंगली सर्वाधिक चर्चा, आतमध्ये नेमकं काय काय घडलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.