बिग बॉस १६ चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. मराठमोळा शिव ठाकरे व पुण्याचा एमसी स्टॅन या दोघांमध्ये बिग बॉसच्या ट्रॉफीसाठी चुरशीची लढत पाहायला मिळाली. या सीझनच्या विजेतेपदाचा मान mc stan ने पटकावला. तर या खेळात शिव ठाकरे हा उपविजेता झाल्यामुळे प्रेक्षक ही नाराज असल्याचे दिसतंय आहेत. असं असलं तरी यंदाच्या सिझनची ट्रॉफी ही मंडळींकडे असल्याचा आनंद त्यांना अधिक आहे. मराठी बिगबॉस नंतर हिंदी बिगबॉसमुळे शिवने प्रेक्षकांच्या मनावर स्वतःचे नाव कोरल आहे. बिगबॉसच्या घरात असताना त्याने अनेकदा वीणाला मिसही केले. त्यामुळे शिव वीणा पुन्हा एकत्र आले का? तसेच घरातून बाहेर पडल्यानंतर तो वीणाला भेटलाय का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. तर यावर अखेर शिवने खुलासा केला आहे.(shiv thakare on veena jagtap)
‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचा शिव ठाकरे विजेता ठरला. त्यावेळी बिगबॉसच्या घरात असताना शिव ठाकरे व वीणा जगतापचे सूर जुळले होते. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांची विशेष पसंती देखील मिळत होती. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतरही बराच काळ ते रिलेशनशिपमध्ये होते. परंतु, नंतर काही काळाने शिव व वीणा एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांनी त्यांच्या वेगळं होण्याचं कारण करिअर असल्याचे सांगितले. त्यानंतर मात्र शिव आणि वीणा कधीही एकत्र स्पॉट झाले नाहीत.
====
हे देखील वाचा- सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील ‘या’ अभिनेत्याची लग्नपत्रिका तयार
====
बिग बॉस हिंदीच्या घरात अनेकदा वीणा शिवच्या नात्याची चर्चा झाली. आता बिग बॉस’च्या घरातून बाहेर येताच शिवने एक मुलाखत दिली. या मुलाखती दरम्यान त्याने एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री वीणा जगतापबरोबरच्या रिलेशनशिपबाबत भाष्य केलं आहे. या मुलाखतीत त्याला वीणाबरोबर अजूनही संपर्कात आहेस का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देत शिव असे म्हणाला की “आम्ही आता रिलेशनशिपमध्ये नसलो तरी बिग बॉसमध्ये येण्याआधी मी तिच्याशी बोललो होतो”.(shiv thakare on veena jagtap)
नात्याबाबत माध्यमांमध्ये चर्चा
आजही अनेकदा शिव व वीणाबद्दलच्या नात्याबाबत माध्यमांमध्ये चर्चा होताना दिसतात. शिव आणि वीणा एकत्र यावेत अशी इच्छा त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे. आता शिव आणि वीणा पुन्हा एकत्र येणार का याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत. शिवने याआधी अनेक रिएलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. ‘एम टीव्ही’वरील रोडीज या शोचा तो स्पर्धक होता. याशिवाय तो सलमान खानच्या ‘किसी का भाई, किसी की जान’ किंवा ‘टायगर ३’ या चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा आहे.