काही अभिनेते चित्रपटात ज्या जिद्दंन काम करतात तिचं जिद्द, आपुलकी त्याचा रोजच्या आयुष्यात ही कायम असते. असंच काहीस घडलय अभिनेते अजय पुरकर यांच्या सोबत. काही दिवसांपूर्वी अजय पुरकर यांनी सह्याद्रीच्या मुशीत वसलेल्या विशाळगडच्या पायथ्याशी एक सुंदर घर बांधलं. या वास्तूला त्यांनी आईबाबांचं घर असं नाव ही दिल. याच वस्तू बद्दल एक महत्वाची घोषणा त्यांनी केली आहे.(ajay purkar home)
विशाळगडच्या पायथ्याशी असलेली हि सुंदर वास्तू फक्त अजय पुरकर यांच्या व्यतिरिक्त सर्वसामान्य प्रेक्षकांना, दुर्गप्रेमींना सुद्धा वापरता येणार आहे. या बद्दल अधिकृत माहिती अजय यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून दिली आहे. त्यांची त्याच्या इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले आहे “नमस्कार सर्वांना..
विशाळगडच्या पायथ्याशी असलेलं मी बांधलेलं आई बाबांचं घर आता तुम्हा सर्वांसाठी खुले..
मित्र मैत्रिणींचा गृप असो किंवा आपल्या आई बाबांची छोटी ट्रीप..
या.. रहा.. ताजेतवाने व्हा.. “
मित्र मैत्रिणींचा ग्रुप असो वा आई बाबांसोबत एखादी छोटी ट्रिप इथे या राहा ताजेतवाने व्हा असं म्हणत अजय पुरकर यांनी हे घर सर्वांसाठी खुलं केलं आहे. अधिकृत नोंदणीसाठी त्यांनी कॅप्शन मध्ये त्या संबंधित एक लिंक सुद्दा दिली आहे जिथून तुम्ही तुमचं बुकिंग करू शकता. त्यांच्या या निर्णयाचं प्रेक्षकांनी कमेंट्सचा वर्षाव करत कौतुकं केलं आहे. तर अनेक चाहत्यांनी आम्हाला यायचं आहे इथे अशा हि कमेंट्स केल्या आहेत.(ajay purkar home)
मालिका ,चित्रपट या सर्वांमधून रंगभूमीशी नाळ जोडून असलेला अभिनेता म्हणून अजय पुरकर यांची ओळख करून दिली जाते. लक्षवेधी अभिनय, करारी आवाज ही अजय यांच्यातील उत्तम गुण अनेक दिगदर्शकांना त्यांच्या कडे आकर्षित करतात. अजय यांनी केलेल्या भूमिकांपैकी त्यांनी साकारलेली दिगपाल लांजेकर दिगदर्शित ‘पावनखिंड’ चित्रपटातील ‘युद्धवीर बाजीप्रभू देशपांडे’ यांची भूमिका प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणि मनात स्फूर्ती आणणारी ठरली.
====
हे देखील वाचा – सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील ‘या’ अभिनेत्याची लग्नपत्रिका तयार
====
तर पुढे अनेक चित्रपटांमधून ते अनेक भूमिका करताना दिसणार आहेत.