शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मोठ्या बॅनरचे चित्रपट मला का मिळत नाही?”, शिल्पा शेट्टीने बोलून दाखवली खंत, म्हणाली, “माझे चित्रपट चालले नाहीत पण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 13, 2023 | 11:00 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Shilpa Shetty Revels Truth

"मोठ्या बॅनरचे चित्रपट मला का मिळत नाही?", शिल्पा शेट्टीने बोलून दाखवली खंत, म्हणाली, "माझे चित्रपट चालले नाहीत पण..."

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी नक्कीच तिच्या काळातील सर्वात फिट दिसणार्‍या अभिनेत्रींपैकी एक आहे. आजवर शिल्पाने स्वत:ला सांभाळून ठेवले आहे. फिटनेसच्या बाबतीत ती सदैव तत्पर असते. सोशल मीडियावरूनही ती कायम चाहत्यांसह फिटनेसचे अनेक व्हिडिओ शेअर करत असते. बरं, याशिवाय ही अभिनेत्री तिच्या अभिनय कौशल्यासाठी देखील ओळखली जाते. तिने तिच्या अभिनयाची जादू ‘धडकन’, ‘बाजीगर’ आणि इतर अनेक चित्रपटांमधूनही दाखवली. नुकत्याच तिने सिद्धार्थ काननशी साधलेल्या संवादात मोठा खुलासा केला आहे. कोणत्याही मोठ्या बॅनरने तिला चित्रपटाची ऑफर दिली नाही, याबाबत शिल्पाने मुलाखतीदरम्यान भाष्य केलं. (Shilpa Shetty Revels Truth)

याबाबत बोलताना शिल्पा म्हणाली, “मोठ्या बॅनरचे चित्रपट मला का नाही मिळत? याबद्दल मला कायम आश्चर्य वाटायचं. आज मी जे काही मिळवलंय, ते मोठ्या कलाकारांसह छोट्या चित्रपटांमध्ये काम करून मिळवलं आहे. अनेक चित्रपटांमध्ये मी छोट्या-मोठ्या भूमिका केल्या, माझे चित्रपट चालले नाहीत पण, माझी सगळी गाणी हिट झाली. बॉलीवूडमध्ये फक्त मी माझ्या गाण्यांमुळे टिकून आहे.” शिल्पाच्या गाजलेल्या आयटम सॉंगबद्दल बोलायचं झाल्यास ‘आये हू यूपी, बिहार लुटणे’ या गाण्याचा समावेश आहे.

शिल्पा पुढे म्हणाली,”मला कधीच अभिनेत्री असा टॅग मिळाला नाही. बॉलीवूडमध्ये मला फक्त ग्लॅमरस भूमिकांसाठी विचारणा केली जायची. ‘मैं खिलाडी तू अनाडी’ हा चित्रपट सुपरहिट ठरल्यावर माझं नाव आघाडीच्या अभिनेत्रींबरोबर घेतलं जायचं. परंतु, मला कधीच स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली नाही.”

आणखी वाचा – चित्रपटसृष्टीला आणखी एक धक्का, ‘शोले’ फेम अभिनेते बिरबल यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

जुने दिवस आठवून तिने असेही सांगितले की, ” बरेचदा असंही झालं की माझ्या कामाचा मोबदला मला निर्मात्यांनी दिलाच नाही. ९० च्या दशकातील काही चित्रपट आहेत ज्यात मी काम केले आहे पण ज्यावेळी मोबदला देण्याची वेळ यायची तेव्हा निर्माते म्हणायचे, ‘अरे, आमचे नुकसान झाले आहे.’ असं बोलून कित्येकांनी त्या काली उर्वरित रक्कम दिलेली नाही. तो काळ खूप वेगळा होता,”

आणखी वाचा – Video : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा बहुचर्चित ‘द व्हॅक्सिन वॉर’चा ट्रेलर प्रदर्शित, अवघ्या काही तासातच ट्रेलरला मिळाले इतके व्ह्यूज

शिल्पा शेट्टीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास लवकरच ती ‘सुखी’मध्ये दिसणार आहे. सुखी चित्रटाचा ट्रेलर आधीच रिलीज झाला असून २२ सप्टेंबर रोजी हा चित्रपट रुपेरी पडद्यावर पाहणं रंजक ठरेल. याशिवाय शिल्पा शेट्टी लवकरच रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलिस फोर्स’ या वेब सिरीजसह सिद्धार्थ मल्होत्रा ​​सह-अभिनेता असलेल्या ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे.

Tags: bollywood actressentertainmentshilpa shetty
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Gaurav More in Mahaparinirvaan Movie

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्रपटात काम करताना दिसणार गौरव मोरे, चित्रपटाचं नावही बदललं कारण…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.