प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी वर्षाकाठी अनेक चित्रपट निर्मित केले जातात. वर्षभर प्रेक्षकांना मनोरंजनाच्या मेजवानीचा आस्वाद घ्यायला मिळतो. या चित्रपटांच्या यादीत अग्रेसर असलेलं एक नाव म्हणजे अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता प्रसाद ओक. अनेक मराठी चित्रपटांमधून उत्कृष्ट अभिनय तसेच काही चित्रपटांचं उत्कृष्ट दिग्दर्शन करून प्रसादने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.(Gaurav More in Mahaparinirvaan Movie)
सध्या प्रसादच्या आगामी चित्रपटाची सर्वत्र चांगलीच चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘महापरिनिर्वाण’. तत्पूर्वी या चित्रपटाचं नाव केवळ परिनिर्वाण ठेवण्यात आलं होतं. आता मात्र काही कारणास्तव चित्रपटाचं नाव बदलून ‘महापरिनिर्वाण’ असं ठेवण्यात आलं आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली त्या संदर्भात एक व्हिडिओ प्रसादने त्याच्या इंस्टाग्राम अकॉउंट वरून शेअर केला. शेअर केलेल्या व्हिडिओला प्रसादने “ ‘महापरिनिर्वाण’ वंदनीय बाबासाहेबांचा आशीर्वाद घेऊन आज मुहूर्त संपन्न झाला…!!! उद्यापासून चित्रीकरण सुरु…!!! आपल्या शुभेच्छा आणि प्रेम पाठीशी असू द्या…!!!” असं कॅप्शन देखील दिलं आहे. प्रसादच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी तसेच इतर कलाकार मंडळींनी देखील शूभेच्छा दिल्या आहेत.(dr babasaheb ambedkar)
हे देखील वाचा – चित्रपटसृष्टीला आणखी एक धक्का, ‘शोले’ फेम अभिनेते बिरबल यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
प्रसादसह या चित्रपटात महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेता गौरव मोरे देखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. गौरवने ही त्याच्या अकॉउंट वरून या संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. गौरवने पोस्ट केलेल्या या फोटोवर अभिनेता समीर चौघुले ने देखील कमेंट करत गौरवचं अभिनंदन केलं आहे. समीरने लिहिलय “गौऱ्या तुला मनापासून शुभेच्छा..हा चित्रपट भरघोस यश मिळवेल मित्रा….आम्हाला तुझा अभिमान आहे”. (mahaparinirvaan)
हे देखील वाचा – Video : ‘सारेगमप’च्या सेटवर मृण्मयी-गौतमीमध्ये वाद, भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
याआधी प्रसादच्या ‘चंद्रमुखी’ चित्रपटाला आणि ‘धर्मवीर’ चित्रपटातील त्याने साकारलेल्या स्वर्गीय आनंद दिघे यांच्या भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रतिसाद मिळाला. तसेच ‘महापरिनिर्वाण’ सोबतच प्रसाद ओक धर्मवीर चित्रपटाच्या पुढील भागात पुन्हा एकदा आनंद दिघे यांच्या भूमिकेत झळकणार आहे. गौरव (gaurav more mhj) देखील ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटासह एका हिंदी आणि ‘अंकुश’ या मराठी चित्रपटात झळकणार आहे.