‘द काश्मीर फाईल्स’च्या मोठ्या यशानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री लवकरच ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच अवघ्या काही तासातच १ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या महिन्याच्या अखेरीस हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (The Vaccine War Trailer)
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाची घोषणा केली, तेव्हापासून देशभरात हा चित्रपट चर्चेचा विषय बनला आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून या चित्रपटाबद्दल सर्वांच्याच मनात प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटाच्या ट्रेलरआधी याचा टिझर आणि पोस्टर्ससुद्धा प्रदर्शित झाले आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. त्यालादेखील प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
हे देखील वाचा – भिक मागून आणलेल्या पैशांचं तृतीयपंथी पुढे काय करतात? गौरी सावंत यांनी उघड केलं सत्य, म्हणाल्या, “ते पैसे…”
तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये आपल्याला ज्या संशोधकांनी देशातील पहिली कोरोना प्रतिबंधक लस कशी तयार केली, संशोधकांना यादरम्यान आलेला संघर्ष, त्यांच्या प्रवासात आलेले अडथळे अन् या सगळ्यावर मात करत देशाला या महामारीतून बाहेर काढण्यासाठी लस बनवणाऱ्या वैज्ञानिकांची जिद्द हे सगळं पाहायला मिळणार आहे.
हे देखील वाचा – मधुराणी प्रभुलकरची लेकही नाटक बसवणार, अभिनेत्रीनेच सांगितला प्लॅन, म्हणाली, “माझ्यापेक्षा माझी मुलगी…”
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट देशातील पहिला बायो-सायन्स चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये नाना पाटेकर, अभिनेत्री पल्लवी जोशी मुख्य भूमिका साकारणार आहे. तर या दोघांसह अभिनेते अनुपम खेर, सप्तमी गौडा, रायमा सेन, गिरीजा ओक आदी कलाकारही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अभिनेता आर. माधवननेदेखील या चित्रपटाचे भरभरून कौतुक केलं. येत्या २८ सप्टेंबर रोजी हा चित्रपट अनेक भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.