‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ च्या पर्वात स्पर्धक मंडळी धुमाकूळ घालताना दिसत आहेत. यंदाच्या या नव्या पर्वात रील स्टार, अभिनेते, अभिनेत्री, रॅपर यांसारख्या विविध कलाक्षेत्रातील मंडळींना संधी मिळाली. यांत भर घालत आता ‘बिग बॉस’च्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एण्ट्री झालेली पाहायला मिळत आहे. यंदाच्या या नव्या पर्वातील पहिला वाईल्ड कार्ड स्पर्धक ‘बिग बॉस’च्या घरात आला आहे. अखेर संग्राम चौगुले हा रांगडा गडी या खेळात वाइल्ड कार्ड सदस्य म्हणून आला आहे. (Sangram Chougule Wild Card Entry)
संग्राम चौगुले हा मूळचा कोल्हापूरचा आहे. लोकप्रिय बॉडीबिल्डर म्हणून त्याने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. संग्राम फिटनेस फ्रिक असून २०१२ मध्ये त्याने ८५ किलो वजनी गटात मिस्टर युनिव्हर्सचं विजेतेपद पटकावलं होतं. तर, २०१४ मध्ये संग्रामने मिस्टर वर्ल्ड स्पर्धा जिंकली होती. त्याने एकूण सहा वेळा मिस्टर इंडिया व पाच वेळा मिस्टर महाराष्ट्र हा किताब पटकावला. संग्रामच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल सांगायचं झालं तर, तो इलेक्ट्रिकल इंजिनीअर आहे.
आणखी वाचा – गणरायाच्या दर्शनासाठी सासरवाडीला पोहोचला प्रथमेश परब, बायकोबरोबरचा फोटो केला शेअर, पारंपरिक लूकही लक्षवेधी
मनगटात ताकद, बोलण्यात वजन, वागण्यात कोल्हापुरी बाणा असलेल्या बलवान आणि आपल्या महाराष्ट्राची शान असलेल्या संग्राम चौगुलेच्या एण्ट्रीने स्पर्धकांचे धागे दणाणले आहेत. संग्राम चौघुलेच्या पत्नीने म्हणजेच स्नेहल चौघुले यांनी इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा प्रोमो शेअर करत कलर्स मराठी व ‘बिग बॉस’ला टॅग करत ‘बिग बॉस’मध्ये संग्राम येणार असल्याची बातमी आधीच दिली. ‘बिग बॉस’च्या घरात संग्रामची एण्ट्री होताच सारे स्पर्धक खुश दिसले.
आणखी वाचा – उर्मिला कोठारेच्या लेकीने दिलं गोड सरप्राइज, घरी बाप्पांना विराजमान केलं, व्हिडीओ पाहून कौतुकाचा वर्षाव
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, संग्रामने ‘बिग बॉस’च्या घरात पाऊल टाकताच छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयजयकार करत एण्ट्री केली. ‘बिग बॉस’च्या घरात येताच सर्व स्पर्धकांनी संग्रामच दणक्यात स्वागत केलं. त्यानंतर संग्रामने घरात येताच त्यांना धमकी दिलेली पाहायला मिळाली. “तू आता पॉवर दाखवली आहेस ती कमकुवत लोकांना दाखविली आहे. तुला आता मिळेल”, असं उत्तर देत संग्रामने धमकी दिली.