कलाकारांच्या मायलेकींच्या जोड्या या नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. कलाकारांच्या खऱ्या आयुष्याबाबत, त्यांच्या कटुंबाबाबत जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमीच आवडतं. अशातच अभिनेत्री उर्मिला कोठारे आणि तिची लेक जिजा कोठारे यांची जोडीही प्रेक्षकांना अधिक आवडते. उर्मिला जिजाबरोबरचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असते. अशातच आता उर्मिलाने जिजाबरोबर शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. कारण समोर आलेला हा व्हिडीओ खूप खास आहे. (Urmila Kothare jija kothare)
सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. आणि अशातच कोठारे परिवारानेही गणेशोत्सव अगदी वेगळ्या पद्धतीने साजरा केला असल्याचं समोर आलं आहे. हा बाप्पा उर्मिलाने नव्हे तर तिची लेक जिजाने घरी आणला आहे. जिजाने स्वतःच्या खेळण्यामधील बाहुलीला गणरायाचे रुप देत गणेशोत्सव साजरा केला. उर्मिलानेही जिजाच्या या हटके विचारशैलीला प्राधान्य देत गणरायाचे स्वागत केले.
आणखी वाचा – मुलगी झाली हो! गणेशोत्सवादरम्यानच दीपिका-रणवीरच्या घरी चिमुकलीचे आगमन, गोंडस मुलीला दिला जन्म
उर्मिलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत गणरायाच्या स्वागताची तयारी करतानाचा एक सुंदर असा व्हिडीओ शेअर केला आहे. “नमस्कार, तुम्हा सर्वांना गणेश उत्सवाच्या मनःपुर्वक शुभेच्छा. जिजाने मला सरप्राईज केले. तिने स्वतः तिच्या बाहुलीतून हा गोंडस गणु बाप्पा बनवला अणि म्हणाली तिला गणेश चतुर्थी साजरी करायची आहे. त्यामुळे तिने बनवलेल्या बाप्पाची आपण पूजा करायची आणि ही बाप्पाची इच्छा समजून मी सुद्धा तिची कल्पना उचलून धरली”.
पुढे तिने लिहिलं आहे की, “अशा प्रकारे काल आमच्या घरी बाप्पाचे आगमन झाले. यापुर्वी आम्ही बाप्पा घरी आणायचो नाही, पण यावर्षी जिजामुळे हा बाल गणेश खूप आनंद व समृद्धी घेऊन आमच्या घरी आला. गणेश चतुर्थी च्या खूप खूप शुभेच्छा”, असं कॅप्शन देत उर्मिलाने त्यांच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पांची कथा सांगितली. यापूर्वी कोठारेंच्या घरी गणपती बाप्पा नाही यायचे मात्र जिजा मुळे त्यांच्या घरी गणराय विराजमान झाले आहेत. जिजाचा मित्रपरिवारही बाप्पाच्या दर्शनाला आलेला दिसला.