मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शेफाली जरीवालाच्या शोकसभेत ढसाढसा रडले वडील, सासऱ्यांना सांभाळत राहिला पराग त्यागी, भावुक Video Viral

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 3, 2025 | 11:43 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shefali Jariwala Prayer Meet

शेफाली जरीवालाच्या शोकसभेत ढसाढसा रडले वडील, सासऱ्यांना सांभाळत राहिला पराग त्यागी, भावुक Video Viral

शेफाली जरीवालाच्या निधनानंतर तिचं संपूर्ण कुटुंबिय पूर्णपणे कोलमडून गेलं आहे. वयाच्या अवघ्या ४२व्या वर्षी शेफालीने या जगाचा निरोप घेतला. सगळं काही सुरळीत सुरु असताना तिला मृत्यूने कवटाळलं. अंधेरीतील राहत्या घरी शेफाली मृत अवस्थेत आढळली. हृदयविकाराच्या झटक्यामुळे तिला आपला जीव गमवावा लागला. शेफालीला लगेचच उपचारासाठीही नेण्यात आलं. मात्र लगेचच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. शेफालीच्या निधनाची बातमी समोर येताच कुटुंबियांसह संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला. तर तिच्या आई-वडिलांची अवस्था पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. दरम्यान शेफालीच्या निधनाला पाच ते सहा दिवस उलटले आहेत. कुटुंबियांनी यावेळी शोकसभेचं आयोजन केलं होतं. (Shefali Jariwala Prayer Meet)

बुधवारी (२ जुलै) शेफालीसाठी शोकसभेचं आयोजन केलं होतं. यावेळी अनेक मंडळी उपस्थित होते. दरम्यान शेफालीचा पती पराग त्यागी आणि तिचे आई-वडील यांना अश्रू अनावर झाले. याच शोकसभेदरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शेफालीचे वडील सतीश जरीवाला ढसाढसा रडताना दिसत आहेत. वडील रडत आहेत हे पाहून पराग त्यांच्या जवळ गेला. त्यांना सांभाळताना दिसत आहे.

आणखी वाचा – २५ वर्षांनंतर नियती राजवाडेचं मालिकाविश्वात कमबॅक, ‘झी मराठी’ वाहिनीवरील नव्या मालिकेतून छोटा पडदा गाजवणार

View this post on Instagram

A post shared by Mamaraazzi (@mamaraazzi)

शेफालीच्या वडिलांच्या खांद्यावर हात ठेवत त्यांना सांभाळताना दिसत आहे. परागचं शेफालीच्या आई-वडिलांशी घट्ट नातं आहे. अनेक व्हिडीओ व फोटोंमध्ये ते दिसूनही आलं. शेफालीच्या निधनानंतर तर त्यांना परागचाच आधार आहे. पराग स्वतःही पूर्णपणे खचून गेला असला तरी शेफालीच्या आई-वडिलांना सांभाळताना त्यांची काळजी घेताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये शेफालीचा हसरा फोटो फुलांनी सजवलेला दिसत आहे. ते दृश्य पाहून नेटकरीही भावुक झाले.

आणखी वाचा – डोक्यात हवा गेली, चॅनेलने बाहेर काढलं अन्…; प्रसिद्ध राशिचक्रकारांचा निलेश साबळेंना टोला, म्हणाले, “सर्वनाश होतो आणि…”

शेफालीचं परागसह हे दुसरं लग्न होतं. लग्नाला ११ वर्ष पूर्ण होताच शेफालीने परागची साथ अर्धवटच सोडली. हे दुःख त्यालाही सहन न होण्यासारखंच आहे. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तो पत्नीबरोबर हसत खेळत होता. मात्र शेफालीला मृत्यूने कवटाळलं. तिच्या निधनाची नेमकी कारणं काय असतील? याबाबत विविध चर्चा रंगल्या. मात्र शेफालीला हृदयविकाराच्या झटक्यामुळेच जीव गमवावा लागला हे सत्य समोर आलं.

Tags: bollywood newsentertainment newsShefali Jariwala
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
marathi actress no home in mumbai

"महिला कलाकार असल्याने…", मुंबईत राहायला घर मिळत नसल्याने मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, "लाज वाटली पाहिजे…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.