बुधवार, सप्टेंबर 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“महिला कलाकार असल्याने…”, मुंबईत राहायला घर मिळत नसल्याने मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, “लाज वाटली पाहिजे…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 3, 2025 | 12:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
marathi actress no home in mumbai

"महिला कलाकार असल्याने…", मुंबईत राहायला घर मिळत नसल्याने मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, "लाज वाटली पाहिजे…"

marathi actress no home in mumbai : मुंबई ही स्वप्ननगरी आहे. प्रत्येकजण आपलं स्वप्न पाहण्यासाठी, ते पूर्ण करण्यासाठी मुंबईची वाट चालतो. दिवस-रात्र जागं असणारं हे शहर नेहमीच अनेकांची स्वप्न पूर्ण करतं. अनेकांना त्यांच्या मुंबईतील या प्रवासादरम्यान चांगले-वाईट अनुभव आलेले पाहायला मिळतात. विशेषतः चित्रपट जगताला तारणारी ही मुंबई कलाकारांना खूप काही शिकवून गेली आहे. अभिनयाची आवड जोपासत आजवर अनेक कलाकार मंडळी स्वप्ननगरीत प्रवेश करत आपलं स्थान निर्माण करु पाहतात. बरेचदा इतर शहरांतून आल्यानंतर राहण्याची, खाण्या-पिण्याची व्यवस्था त्यांना करावी लागते. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीला मुंबईत शहरात आलेला वाईट अनुभव तिने सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे.

मुंबईत भाड्याने घर शोधताना या मराठमोळ्या अभिनेत्रीची झालेली दमछाक तिने या पोस्टमधून मांडली आहे. ही अभिनेत्री म्हणजे पूजा कातुर्डे. पूजाने आजवर मराठी मालिका आणि वेबसीरिजमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत रसिकांच्या मनात घर केलं. अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत, अभिनेत्री असल्याने मुंबईत घर मिळणं कठीण झालं असल्याचं म्हटलं आहे. तिने म्हटलं आहे की, “माझ्या जुन्या मालकाने फ्लॅट विकला. त्यानंतर नवीन घराच्या शोधात निघाले, ‘हाऊसिंग’, ’99 एकर्स, परिसरातील ब्रोकर्स सगळीकडे फोन केले. फ्लॅट पाहिले. वेळ, एनर्जी सगळं दिलं. शेवटी १-२ फ्लॅट्स फायनल केले पण काय झाले? संबंधित घरमालक माहिती घेतो आणि अचानक उत्तर येतं ‘ओह नो अभिनेत्री नको आहे’ याचा अर्थ महिला कलाकार असल्यामुळे घर नाकारलं जातं? असं आहे का?. दुसऱ्या ठिकाणी घर पाहण्यासाठी गेले, तिथे दुसऱ्या घरमालकाने हो म्हटलं होतं पण, जेव्हा बिल्डरने डिटेल्स मागवले तेव्हा बिल्डर म्हणतो, ‘सिंगल आहे? अभिनेत्री आहे? मग नाहीच!”.

आणखी वाचा – २५ वर्षांनंतर नियती राजवाडेचं मालिकाविश्वात कमबॅक, ‘झी मराठी’ वाहिनीवरील नव्या मालिकेतून छोटा पडदा गाजवणार

View this post on Instagram

A post shared by Pooojaa (@poojaakaturde9)

पुढे तिने म्हटलंय, “अजून एके ठिकाणी सोसायटी कमिटीची मिटींग सुरु होणार होती. या मिटींगमध्ये काही बुद्धिमान सदस्यांना माझं Actor असणं ही समस्या वाटली. म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे? अभिनेत्री म्हणजे गोंधळ? सिंगल मुलगी म्हणजे संशयास्पद? तुम्ही आम्हाला फक्त टीव्हीवर, स्क्रीनवर पाहता पण, खऱ्या आयुष्यात आम्हाला रिजेक्ट करता कारण काय तर आम्ही ‘Actor’ आहोत. तुमच्या सोसायटीत पती-पत्नी एकमेकांवर ओरडतात, केसेसही चालू असतात पण सगळ्यांना त्रास होतो फक्त कलाकारांचा? काय भोंदू विचार आहेत हे? तुमच्या सोसायटीमध्ये मुली नाहीत का? कोणी स्वतःचं करिअर घडवणारं राहिलं नाही का? मुंबईसारख्या शहरातही ही परिस्थिती आहे? याची लाज वाटत नाही का? मग आम्ही कुठे राहावं? तुम्हाला काय वाटले कलाकार म्हणजे नाचणारे-गाणारे म्हणून गोंधळ होणार असं काहीच नाही. कलाकार म्हणजे बदमाश, चारित्र्यहीन अशी प्रतिमा या समाजात निर्माण झाली आहे”.

आणखी वाचा – शेफाली जरीवालाच्या शोकसभेत ढसाढसा रडले वडील, सासऱ्यांना सांभाळत राहिला पराग त्यागी, भावुक Video Viral

शेवटी तिने लिहिलं, “घरमालक म्हणतात महिला कलाकार नको आणि बिल्डर म्हणतो सिंगल मुलगी नको. तुम्ही कोण आहात ठरवणारे आम्ही कुठे राहायचं ते? घर विकायचंय, भाड्याने द्यायचंय पण जजमेंट्सह. तुमच्या घरात सगळे व्यवस्थित लग्न करुन, नोकरी करुनच राहत आहेत का? त्यांना लाज वाटली पाहिजे असा भेदभाव करताना… मी घर शोधतेय आणि घर नाकारलं जातं कारण मी स्वावलंबी आहे, स्वतंत्र आहे आणि स्वप्नांवर जगते. मग सांगा, लग्न करुन येऊ? तेव्हा घर देणार का मग?. आज मी अभिनेत्री आहे. सिंगल आहे. स्वतंत्र आहे. कोणाकडे भीक मागत नाही पण, घर हवं आहे दया नको”.

Tags: marathi actressMarathi newspooja katurde
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
 pandharpur wari news

Video : कलाकार झाले सेवेकरी! वारकऱ्यांच्या सेवेत आदेश बांदेकर दंग, पायांना मसाज केला अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.