Famous Bollywood actor makes allegations against his wife : ९०च्या दशकात बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता दीपक तिजोरी एकेकाळी लोकप्रिय आणि आवडता चेहरा होता. ‘आशिकी’, ‘जो जीता वही सिकंदर’, ‘कभी हाँ कभी ना’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमधील त्याच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. मात्र, चित्रपटसृष्टीत यश अनुभवणाऱ्या दीपक तिजोरीचं वैयक्तिक आयुष्य मात्र कायमच चर्चेत राहिलं आणि ते कारण होतं त्याचं वैवाहिक जीवन आहे.दीपक तिजोरीने शिवानी अनेजा यांच्याशी विवाह केला होता. शिवानी या पेशाने फॅशन डिझायनर असून, यांना समारा नावाची मुलगी आणि करण नावाचा मुलगा आहे. मात्र, २०१७ साली या नात्यात मोठा वाद झाला. काही वृत्तवाहिनीनुसार शिवानी यांनी दीपकला गोरेगावमधील घरातून बाहेर काढल्याचं समोर आलं होतं. शिवानीला दीपकच्या विवाहबाह्य संबंधांचा संशय होता, असा आरोप करण्यात आला.
आणखी वाचा – “मी सदस्यांशी जुळवून…”, सोनाली राऊतची घरातून एक्झिट, बाहेर पडताच म्हणाली, “माझ्याकडून खूप अपेक्षा…”
नंतर दीपकला पुन्हा घरात राहण्याची परवानगी देण्यात आली, मात्र त्यांना केवळ एकाच खोलीपुरतं मर्यादित ठेवलं गेल्याचं सांगितलं जात होतं. इतकंच नाही, तर घरातील कर्मचाऱ्यांना दीपकला जेवण देऊ नये, अशाही सूचना देण्यात आल्याचं दीपकने सांगितलं. अखेर परिस्थिती इतकी बिघडली की, दीपकला मित्राच्या घरी राहण्यासाठी जावं लागलं. या सर्व प्रकरणानंतर शिवानी यांनी दीपकपासून घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आणि पोटगीचीही मागणी केली. मात्र, याच टप्प्यावर या प्रकरणाला एक मोठा कायदेशीर वळण मिळाला. ‘बॉलिवूड शादी’च्या वृत्तानुसार, दीपक तिजोरीने असा दावा केला की, त्याचं आणि शिवानीचं लग्न कायदेशीरदृष्ट्या नव्हतं. दीपकच्या म्हणण्यानुसार, शिवानी यांनी त्यांच्याशी लग्न करण्यापूर्वी पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतलेला नव्हता. त्यामुळे हे लग्न कायद्याने अमान्य ठरतं, असा त्याचा वाद होता. या दाव्यामुळे घटस्फोट आणि पोटगीच्या मागणीभोवती अनेक प्रश्न निर्माण झाले आणि प्रकरण अधिक गुंतागुंतीचं बनलं. (Famous Bollywood actor makes allegations against his wife)
वाद चिघळल्यानंतर अखेर शिवानी यांनी मौन सोडत प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी दीपक तिजोरीवर गंभीर आरोप करत नाराजी व्यक्त केली होती. “दीपक तिजोरी माझे २२ वर्षांहून अधिक काळ पती आहेत आणि ते माझ्या मुलीचे वडील आहेत. त्यांनी नैतिकता, सभ्यता आणि संवेदनशीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत,” असं शिवानी यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं. मात्र, प्रकरण न्यायालयात सुरु असल्यामुळे त्यांनी यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला होता. (Famous Bollywood actor makes allegations against his wife)





