रविवार, जुलै 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

२ महिन्यांपूर्वी लग्न आणि आता आईचं निधन; मराठी अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर, म्हणाली “मला संसारात पाडून तू मात्र निघून गेलीस”

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 3, 2026 | 10:16 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi Actress mother passes away

मराठी अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर

Marathi Actress mother passes away : मराठी मनोरंजनसृष्टीतून एक हळवी करणारी बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवे हिच्या आयुष्यात मोठं दुःख कोसळलं असून तिच्या आईचं दुःखद निधन झालं आहे. या घटनेची माहिती स्वतः भाग्यश्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. ‘कुंकू, टिकली आणि टॅटू’, ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’, ‘रमा राघव’ आणि हिंदी मालिका ‘माटी से बंधी डोर’ यांसारख्या मालिकांमधून अभिनयाची छाप उमटवणारी भाग्यश्री सध्या या तिच्या वैयक्तिक दुःखातून जात आहे. काही दिवसांपासून तिची आई आजारी होती. पण उपचारादरम्यान त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

आईसोबतचा एक भावूक फोटो शेअर करत भाग्यश्रीने मनातील भावना सांगितल्या. या पोस्टमध्ये तिने आईबद्दल लिहिलेला भावनिक संदेश सध्या अनेकांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. या पोस्टमध्ये भाग्यश्री म्हणते, “आई! आज माझ्या लग्नाला फक्त दोन महिने पूर्ण होत आहेत, पण दोन महिन्यात आईने मला एकही फोन केला नाही. का तर ‘सासरी गेलेल्या मुलीला आईने सारखा फोन करू नये. तिचं संसारात लक्ष लागत नाही”. अश्या मताची माझी आई मला एकही फोन न करता देवाघरी गेली आणि आता माझ्या आईचा कधीच फोन येणार नाही. लग्नाला दोन महिने पण झाले नाहीत आणि तू मला सोडून गेलीस हे मला मान्य होत नाही. मला शेवटपर्यंत तुझ्यापाशी रहायचं होत म्हणून मला लग्न नव्हत करायचं. पण तू…, ‘माझी शेवटची इच्छा आहे.”

आणखी वाचा – घटस्फोट न घेताच दुसरं लग्न केलं अन्…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचे पत्नीवर गंभीर आरोप, धक्कादायक सत्य समोर

“तू माझ्यासाठी लग्न कर आणि मागे वळून बघू नकोस, माझं काय पण होईल पण तू मागे वळून यायचं नाहीस. मुलगी म्हणून तू खूप जास्त केलं आहेस. तू आता तुझा विचार कर माझ्यासाठी’ खूप ठाम तिचा निर्णय. एका भेटीत मला तिने मला लग्नाचा निर्णय द्यायला भाग पाडलं. मी काय करते हे मला तेव्हा लक्षात आलं नाही. फक्त आई सांगतेय आणि आईची इच्छा म्हणून या लग्नाला उभी राहिले. पण आई आज तू गेल्यावर मला कळलं आहे तू माझ्यासाठी निवडलेला मुलगा आणि घर खरंच माझ्यासाठी किती बरोबर आहे.” यानंतर पुढे ती म्हणते, “तुझ्यासाठी मी लग्न केलं पण तू फक्त माझं लग्न पाहिलं. माझा संसार पहायला तू मला आयुष्यभर हवी होतीस. माझ्या नारायणाला आता कोण नमस्कार करेल सांग? दर पौर्णिमेला मी त्या सत्यनारायणाला दिवा लावायचे आणि तुझ्यासाठी प्रार्थना करायचे. पण कालच्या पौर्णिमेला मी तुझ्या नारायणाबरोबर तुझ्या चितेला नमस्कार करत होते.”

View this post on Instagram

A post shared by Bhagyashree Nh🇮🇳 (@bhagyashreenh)

आणखी वाचा – ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाची उत्सुकता, मिर्झा राजे जयसिंग यांच्या भूमिकेत दिसणार पुनीत इस्सर, लूक समोर

“मला तू अशी सोडून जायला नको होतीस.. आईला लेकराचं चांगलाच कळतं हे खरंच. पण तरीही आई तू मला हवी होतीस. आता मला कोण राणा म्हणेल. मला संसारात पाडलंस आणि तू मात्र निघून गेलीस. तू सांगितल्याप्रमाणे आई मी मागे वळून बघणार नाही हे तुला माझं वचन आहे.” भाग्यश्रीच्या या शब्दांनी चाहत्यांसह अनेक कलाकारही भावूक झाले असून सोशल मीडियावर ही पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे. आई-लेकीच्या नात्यातील ही भावना सध्या सर्वांच्याच मनाला भिडत आहे.

Tags: marathi actressMarathi Actress mother passes away
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Bigg Boss Marathi 6

कॅप्टन्सी टास्कदरम्यान रुचिता-करणची मारामारी, 'बिग बॉस'च्या घरात करणचा राग अनावर, रुचिताच्या अंगावर धावून गेला अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.