छोटा पडदा प्रेक्षकांच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग ठरत आहे. अनेक मालिकांच्या कथा लोकांना प्रेरणा देत आहेत तर कधी कधी निखळ मनोरंजन. मालिकाविश्वात सध्या आघाडीवर असलेली मालिका म्हणजे आई कुठे काय करते या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
मालिकेत नकारात्मक भूमिका करत असलेल्या पात्रांना बाहेर बरीच सकारात्मक प्रतिक्रिया प्रेक्षक देत असतात. मालिकेत संजना हे पात्र साकारत असलेली अभिनेत्री रुपाली भोसले(Rupali bhosle) सध्या आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना आपलसं करण्यात व्यस्त आहे. रुपाली सोशल मिडिया वर नेहमी सक्रिय असते.
तिचे फोटोज, रिल्स प्रेक्षकांमध्ये तुफान व्हायरल होताना दिसतात. चाहते तिच्या पोस्ट वर भरभरून कमेंट्स करताना ही आपल्याला दिसतात.

काही दिवसांपूर्वी रुपाली ने एका सुंदर लुक वरचे फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केले होते. रुपालीच्या या फोटोंना चाहत्यांनी चांगलंच प्रेम दिलं. रुपाली ने पोस्ट केलेल्या प्रत्येक फोटो वर कमेंट्स, लाईक्सचा वर्षाव झाला. कधी कधी चाहते आपल्या आवडत्या कलाकारांच्या अदांवर काही हटके कमेंट्स करत असतात. असच काहीस झालं आहे रुपाली ने पोस्ट केलेल्या फोटोज बाबत. एका चाहत्याने एक सुंदर शायरी करत रुपालीच्या अदांना दाद दिली आहे. शायराना अंदाजात चाहत्याने लिहिलं आहे
“ख्वाब कहूं या गुलाब कहूं… दिलकश कहूं या लाजवाब कहूं…
वो प्यार से भी प्यारी है… नाम उसका रुपाली है 💚❤⚘⚘😍😍” या शायरी सोबतच पुढे त्याने “Looking So Beautiful Ma’am 🤗” असं ही लिहिलं आहे.(Rupali bhosle)
=====
हे देखील वाचा – झी मराठी वरील ‘या’ प्रसिद्ध मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला
=====
आई कुठे काय करते मालिकेत रुपाली (Rupali bhosle) म्हणजेच संजना, अरुधंती,अनिरुद्ध सध्या एकाच घरात राहत असून मालिकेत अरुंधतीच्या लग्नाचा ट्रॅक चालू आहे आणि अनिरुद्ध त्याला विरोध करताना दिसत आहे. अशातच आता संजना अनिरुद्धला या बाबतीत पाठींबा देणार की अरुंधतीच्या लग्नाच्या निर्णयाचं स्वागत करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.