अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केल्यानंतर #MeToo चळवळीला भारतात वेग आला. यानंतर अनेक महिलांनी आपले किस्से सांगत सोशल मीडियावर अनेकांचा पर्दाफाश केला. या दरम्यान एका टीव्ही अभिनेत्रीनेही तिच्याबरोबर घडलेली घृणास्पद घटना उघड करून सर्वांना आश्चर्यचकित केले. सोनल वेंगुर्लेकर ही एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तिला ‘कही तो लोग कहेंगे’ या मालिकेतून खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. (TV Actress Casting Couch)
‘शास्त्री सिस्टर्स’ या मालिकेतील देवयानी शास्त्रीच्या भूमिकेने ती घराघरात पोहोचली. मात्र, करिअरच्या सुरुवातीला सोनललाही कास्टिंग काउचची शिकार व्हावी लागली. देशात जेव्हा MeToo मोहिमेला वेग आला होता, तेव्हा सोनलनेही तिचा यावेळचा अनुभव सांगितला. त्यावेळी ‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सोनलने खुलासा केला की, “हा तो काळ आहे जेव्हा मी १९ वर्षांची होते आणि स्ट्रगल करत होते, तेव्हा मी कास्टिंग वेबसाइटच्या माध्यमातून राजा बजाज यांना भेटले. राजाने मला ऑडिशनसाठी बोलावले, पण मला संवाद नीट बोलता येत नव्हते. त्याने मला सांगितले की माझा चेहरा चांगला आहे, परंतु मला व्यवसायाची चांगली समज असली पाहिजे आणि मी त्याला शूटिंगमध्ये मदत करावी असे सुचवले”.
सोनल पुढे म्हणाली, “यानंतर राजाने मला कपडे बदलून फोटो सेशनसाठी तयार होण्यास सांगितले. त्याच्या हातात क्रीमची बाटली होती आणि त्याने मला ती परिधान करण्यापूर्वी माझ्या स्तनांवर लावायला सांगितले, यामुळे त्यांना योग्य आकार मिळेल. हे ऐकून मी घाबरले, पण तो स्वतः पुढे आला आणि त्याने जबरदस्तीने माझ्या स्तनांवर क्रीम लावले. मी खूप घाबरले आणि तिथून पळ काढला. त्यावेळी माझ्या कुटुंबातील कोणीही माझ्याबरोबर नव्हते”. यावेळी अभिनेत्रीने असा आरोपही केला होता की, राजाने तिला ‘तांत्रिक विद्या’ माहित असल्याचा दावा करत तिचे सर्व कपडे काढण्यास सांगितले होते. राजाने तिला सांगितले होते की, “मी तुला तांत्रिक विद्या शिकवतो, ज्यामुळे तू रातोरात सुपरस्टार बनशील”.
सोनलने पुढे सांगितले की, राजाने तिला सांगितले की, “तुला माझ्यासमोर कपड्यांशिवाय बसावे लागेल आणि मी जो मंत्र जपणार आहे तो बोलावा लागेल. मी त्याला खडसावले आणि सांगितले की, मला काहीही शिकायचे नाही. हे ऐकून तो पुढे सरसावला आणि जबरदस्तीने माझे कपडे काढण्याचा प्रयत्न करू लागला. “मी कशीतरी त्या खोलीतून बाहेर पडण्यात यशस्वी झाले आणि थेट मॉडेल आणि त्याच्या आईकडे गेले, जे शेजारच्या खोलीत होते”. सोनलने पुढे सांगितले की, “तिने राजाविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, राजाची पत्नी आणि मुलगी शीना यांनी सोनलवर खंडणीचा आरोप केला. सोनल तिच्या वडिलांना पैशांसाठी ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप शीनाने केला होता”.