अभिनेता शशांक केतकर आपल्या चॉकलेट बॉय लूकसाठी विशेष ओळखला जातो. शिवाय त्याचा ऑनस्क्रीन प्रेझेन्स प्रेक्षकांना इतका भावतो, ती अनेक तरुणी तिच्या अभिनयाचे चाहते बनले आहे. ‘होणार सून मी या घरची’ मालिकेत श्रीची भूमिका करणाऱ्या शशांकने अनेक मालिकांमध्ये विविध भूमिका केल्या. एका मालिकेत तर त्याने खलनायकाची भूमिका केली. शशांक सध्या ‘मुरांबा’ मालिकेत काम करत असून त्याच्या भूमिकेवर चाहते पसंती दर्शवत आहे. (shashank ketkar)
अशातच शशांकने एका मालिकेदरम्यान दिग्दर्शकाबरोबर झालेल्या वादावर स्पष्टपणे मत मांडलं आहे. अभिनेता शशांक केतकर दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्या ‘हे मन बावरे…’ या मालिकेत काम करत होता. त्यावेळेस दिग्दर्शक व मालिकेचे निर्माते मंदार देवस्थळी यांच्यावर शशांकसह अन्य कलाकारांनी पैसे थकवल्याचा आरोप केला होता. त्याची चर्चा जोरदार रंगली होती. (shashank ketkar on he mann bawre payment controversy)
आता शशांकने पत्रकार सौमित्र पोटे यांच्या पॉडकास्टमध्ये यावर स्पष्ट बोलला असून त्याने मंदार देवस्थळी बाबत मोठं वक्तव्य केलेलं आहे. सौमित्र पोटे यांच्या पॉडकास्टचा एक प्रोमो समोर आला असून ज्यात त्यांनी शशांकला टीव्हीसृष्टीत कलाकारांना मिळणाऱ्या मानधनात उशीर होत असल्याबद्दल विचारले असता त्याने मंदार देवस्थळींसोबत केलेल्या ‘हे मन बावरे…’ मालिकेविषयी बोलतो आणि म्हणतो, “त्याच मुद्द्याविषयी बोललं तर माझे कैक लाख शिल्लक आहेत, दिग्दर्शकाचेही शिल्लक आहेत. मृणाल दुसानिस जी माझी सहअभिनेत्री होती ती तर अमेरिकेला निघून गेली, तिचेही लाखो रुपये थकलेत. त्या जागेचेही कैक लाख आहेत. त्यावेळी जर आम्ही आवाज उठवला नसता आणि ५ वर्षांनी बोललो असतो, तर मीडियाकडून आम्हाला असं विचारण्यात आलं असतं की तेव्हा तुम्ही का नाही काही बोललात?”
मंदार देवस्थळींबद्दल बोलताना शशांक म्हणतो… (shashank ketkar on mandar devasthali)
पुढे शशांक मंदार देवस्थळींबद्दल बोलताना म्हणतो, “या सगळ्या प्रकरणानंतर त्याच्याकडे पैसे नाहीत, असं तो म्हणत होता आणि त्याला आत्महत्येचे विचार सुचत होते, जे खूप दुर्दैवी होते. अशी वेळ कोणावर येऊ नये, पण जर हेच विचार मला आले असते. एखाद्या ज्युनिअर आर्टिस्टने असा विचार केला असता तर ?” (shashank ketkar on mandar devasthali)
हे देखील वाचा : सह्याद्रीवर रॅपलिंग करताना आकाश ठोसरने बनवली बटाट्याची भजी