बरेच कलाकार असे आहेत जे त्यांच्या कामाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून स्वतःसाठी वेळ देताना पाहायला मिळतात. बरेचदा ते ट्रेकला गेल्याचंही पाहायला मिळत. काही दिवसांपूर्वी अभिनेता आकाश ठोसर याने सह्याद्रीवर गिर्यारोहण करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. चाहत्यांनी या व्हिडिओला डोक्यावर उचलून धरलं, आता यानंतर आकाशचा आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. (Akash Thosar Cooking)
आकाश सध्या सह्याद्रीमध्ये ट्रेक साठी गेला आहे. ट्रेकला गेल्याचे अनेक व्हिडीओ त्याने शेअर देखील केले आहे. अशातच आकाशच्या एका नव्या व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यांत आकाश ट्रेकला गेलेला असून तो तिथे निसर्गाच्या सान्निध्यात भजी बनवत आहे. त्याने भजी बनवतानाच संपूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर केला आहे.
पाहा गिर्यरोहणावेळी आकाशने केलीय ही मज्जा (Akash Thosar Cooking)
आकाशच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत त्याच कौतुक केलं आहे. एकाने कमेंट करत म्हटलं आहे की, घर, बंदूक, भजी. घर बंदूक बिर्याणी चित्रपटामुळे आकाशला भजी बनवताना पाहून नेटकरी कमेंट करत आहेत.
आकाशला अभिनयासोबतच वर्कआउट आणि ट्रेकिंगची विशेष आवड आहे, याचे अनेक व्हिडीओ त्याने आजवर सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच आकाशला कुकींगची सुद्धा आवड आहे. काही दिवसांपूर्वी उन्हाळ्याची सुट्टी म्हणत आकाशने गावाकडे जाऊन नॉनव्हेज बनवलेलं होतं, त्याचा देखील व्हिडीओ त्याने सोशल मीडियावरून चाहत्त्यांसोबत शेअर केला होता.
हे देखील वाचा – स्टार प्रवाहची नक्की कोणती मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?
आकाश सह्याद्रीवर गिर्यारोहणासाठी गेला आहे. तिथे त्याने प्रोफेशनल टीम च्या निगराणी खाली रॅपलिंग केलं आहे. गिर्यारोहण हे साहसी क्षेत्र आहे.एखाद्या डोंगर सुळक्यावर Trekking, Climbing किंवा Rappelling करायची असेल तर, सर्वप्रथम एखादा Rope, Harness आणि safety equipment या साऱ्याची व्यवस्था करुन एखाद्या प्रोफेशनल टीम च्या निगराणी खाली Climbing किंवा Rappelling कराव.
सदर विडिओ हा सगळ्या सेफ्टीचा उपयोग करून एका प्रोफेशनल टीम च्या निगराणी खाली बनवण्यात आला आहे. कोणत्याही धोकादायक वातावरणात प्रवेश करण्यापूर्वी नेहमीच व्यावसायिक सल्ला घ्यावा. असं म्हणत त्याने रॅपलिंग करतानाच व्हिडीओ शेअर केला आहे.
