मराठी आणि हिंदी बिग बॉसमध्ये राखी सावंतचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. बॉलिवूडमध्ये काही दिवसांपासून राखी सावंत कमालीची चर्चेत आहे. आदिल खान दुर्रानी प्रकरणामुळे राखीची सोशल मीडियावर चर्चा रंगलेली पाहायला मिळतेय. दररोज ती आपल्या पती विरोधात काही ना काही नवीननवीन शोधून मीडियासमोर त्याचे खुलासे करताना दिसतेय. राखीने पतीविरोधात तक्रार केल्यानंतर त्याला म्हणजेच आदिल खानला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पतीला अटक केल्यानंतर मात्र आता राखीने या सगळ्यातून बाहेर येत स्वतःला वेगळ्या दिशेला वळविले आहे. पतीच्या प्रकरणातून बाहेर येत तिने स्वतःचे लक्ष पुन्हा एकदा करिअरकडे वळविले आहे.(rakhi sawant new song)
राखी सावंत हिने एका गाण्यासाठी शूटिंग केलं होतं. तिचं ते गाणं आता प्रदर्शित झालं आहे. ‘झुठा’ असं या गाण्याचं नाव आहे. तिच्या आयुष्यात आलेल्या वाईट दिवसानंतर राखीचं हे नवंकोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. झूठा या गाण्याचा टिझर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला होता आता हे गाणं ही प्रदर्शित झालं आहे.
पहा राखीचं नवं गाणं – (rakhi sawant new song)

राखीच्या या नव्या गाण्याला अवघ्या दोन तासातच १७ हजार व्युज मिळाले होते. तर हे गाणं पाहून नेटकऱ्यांच्या कमेंटनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. बऱ्याच जणांनी कमेंट करत म्हटलं आहे की राखीच्या या नव्या गाण्यात राखीच्या खऱ्या आयुष्यात आलेली वादळाची कहाणी सांगण्यात आली आहे. राखीचं हे नवं झूठा हे गाणं अल्तमाश फरिदीने गायलं असून राखीसह सलमान शेखने यामध्ये मुख्य कलाकार म्हणून काम केल आहे. या गाण्याची निर्मिती व दिग्दर्शन कोरिओग्राफर मुदस्सर खानने केली आहे.(rakhi sawant new song)
====
हे देखील वाचा – तेजश्री प्रधानचा चाहत्यांना ‘हा’ सल्ला
राखी सावंत सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. ती तिचे नवनवीन व्हिडीओ, फोटो पोस्ट करत प्रेक्षकांना अनादी ठेवत असते. मनोरंजन करण्यात राखी पटाईत आहे. कॉमेडी क्विन म्हणून ओळखली जाणारी राखी कायमच साऱ्यांचा पसंतीस उतरते. दरम्यान मागील काही दिवसांपासून राखीच्या आयुष्यात बरेच चढ उतार आले. आता या सगळ्यातून काढता पाय घेत राखी आता तिच्या नवीन इनिंगकडे वळली आहे.
