गुरूवार, सप्टेंबर 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘पारू’ फेम अभिनेत्याचा मोठा निर्णय, मानधन थकबाकीनंतर मुलांना शाळेत पाठवणार नसल्याचा मुद्दा समोर; पोस्ट व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 16, 2025 | 1:55 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shantanu Gangane Post 

'पारू' फेम अभिनेत्याचा मोठा निर्णय, मानधन थकबाकीनंतर मुलांना शाळेत पाठवणार नसल्याचा मुद्दा समोर; पोस्ट व्हायरल

Shantanu Gangane Post  : अशी अनेक कलाकार मंडळी आहेत जी मानधन थकबाकीवर बरेचदा आवाज उठवितात. यापैकीच एक म्हणजे पारू फेम शंतनू गंगणे. काही महिन्यांपूर्वी मानधन थकल्याच्या मुद्द्यामुळे शंतनू चर्चेत आलेला पाहायला मिळाला. त्याने सिनेसृष्टीतील काही लोकप्रिय निर्मात्यांवर मानधन थकवल्याचा आरोप केला. यानंतर आता अभिनेता आता वेगळ्याच एका कारणामुळे चर्चेत आला आहे. हे कारण त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील आहे. अभिनेत्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मोठी उलाढाल केली आहे. त्यानं एक मोठा आणि वेगळा निर्णय घेतला असून याबाबत सोशल मीडियाद्वारे स्पष्ट केलं आहे.

अनेक सेलिब्रिटींनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी वेगवेगळे निर्णय आहेत. काहींनी नेहमीपेक्षा वेगळ्या शाळेत आपल्या मुलांना प्रवेश दिला आहे. तर काहींनी शाळेत न पाठवता घरीच शिक्षण देण्याचा म्हणजेच होम स्कूलिंगचा पर्याय निवडला आहे. यांत ‘आई कुठे काय करते’ फेम अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर, ‘बाळूमामाच्या नावाने चांगभलं’ मालिकेचे दिग्दर्शक असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या मुलांना वेगळ्या पद्धतीने शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा – सुभेदारांच्या सूनेवर खिळल्या नजरा; नेहमीच साडीत दिसणाऱ्या सायलीचा मॉडर्न लूक पाहताच चाहते गोंधळात, म्हणाले, “मालिकेत हाच लूक…”

View this post on Instagram

A post shared by Kanchan Shantanu Gangane (@kanchangangane)

यांत आता शंतनू गंगणेचे नावही आले आहे. शंतूनने देखील आता मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या पोस्टद्वारे अभिनेत्याची पत्नी कांचन गंगणे हिने पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “आमच्या कुटुंबासाठी एक नवीन अध्याय सुरु होत आहे. आम्ही पारंपरिक शिक्षण पद्धतीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि आमच्या मुलांचा प्रवास घरातून शिक्षण (Homeschooling) देत करत आहोत. जेथे शाळेच्या फीऐवजी आम्ही खऱ्या आयुष्यातील अनुभवांमध्ये, प्रवासात आणि एकत्र शिकण्यात गुंतवणूक करणार आहोत”.

आणखी वाचा – थकलेलं शरीर, कमी झोप आणि…; सततच्या शूटिंगने अभिनेत्याची वाईट अवस्था, म्हणाला, “धावपळीचा आठवडा…”

शेवटी त्यांनी लिहिलं आहे, “या चॅनलवर आम्ही आमच्या प्रवासातील प्रत्येक पाऊल शेअर करु. आनंदाचे क्षण, संघर्ष, आणि ते साहस जे आमचे वर्गखोल बनतील. दररोज सकाळी ११:११ वाजता आमच्या या प्रवासात सामील व्हा. होमस्कूलिंग, पालकत्व आणि शाळेच्या भिंतींपलीकडील जीवनाचा प्रवास. आमच्या गोष्टीत आपले स्वागत आहे”. या पोस्टखाली अनेकांनी त्यांच्या या हटके निर्णयाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.

Tags: marathi actorshantanu gangane childrenShantanu Gangane Post
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
manache shlok

'तू बोल ना’ गाण्यातून अनुभवायला मिळणार प्रेमाचा प्रवास, ‘मना’चे श्लोक’मधील प्रेमगीत घेतंय मनाचा ठाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.