गुरूवार, सप्टेंबर 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तू बोल ना’ गाण्यातून अनुभवायला मिळणार प्रेमाचा प्रवास, ‘मना’चे श्लोक’मधील प्रेमगीत घेतंय मनाचा ठाव

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 16, 2025 | 4:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
manache shlok

'तू बोल ना’ गाण्यातून अनुभवायला मिळणार प्रेमाचा प्रवास, ‘मना’चे श्लोक’मधील प्रेमगीत घेतंय मनाचा ठाव

manache shlok : ‘मना’चे श्लोक’ चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून मनवा व श्लोकच्या जोडीलाही प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळत आहे. चित्रपटाच्या धमाल टीझरमुळे प्रेक्षक चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. याच उत्सुकतेत भर घालत चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘तू बोल ना’ या गाण्यात मनवा आणि श्लोक यांच्या नात्यात फुलणारं प्रेम पाहायला मिळत आहे. त्या दोघांचे गोड क्षण या गाण्यात दिसत आहेत. या सुंदर गाण्याला तुषार जोशी यांचा मधुर आवाज लाभला असून गौतमी देशपांडेने या गाण्याला शब्दबद्ध केले आहे. तर सिद्धार्थ व सौमिल यांच्या सुरेल संगीताने हे गाणं अधिकच जबरदस्त बनले आहे.

या गाण्याचे चित्रीकरण हिमालयात झाल्याने त्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. हिमालयातील अनेक नयनरम्य दृश्ये या गाण्यातून साऱ्यांच्या मनावर राज्य करत आहेत. हिमाचल प्रदेशमधील या शूटिंगने चित्रपटाची रंगत अधिक वाढविली आहे. यांत मनवा आणि श्लोकची केमिस्ट्री पाहायला मिळत असून या दोघांचे पुढे काय होणार, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

आणखी वाचा – सुभेदारांच्या सूनेवर खिळल्या नजरा; नेहमीच साडीत दिसणाऱ्या सायलीचा मॉडर्न लूक पाहताच चाहते गोंधळात, म्हणाले, “मालिकेत हाच लूक…”

View this post on Instagram

A post shared by Zee Music Marathi (@zeemusicmarathi)

दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे या संपूर्ण अनुभवाबाबत म्हणते, ”या चित्रपटातील हे माझं सर्वात आवडतं गाणं आहे. हिमालयात हे गाणं चित्रित केल्यानं हे दिसतानाही सुंदर दिसत आहे आणि त्या गाण्याच्या चित्रीकरणाचा अनुभवही अत्यंत सुंदर होता आणि प्रेक्षकांना हे नक्कीच आवडेल”.

आणखी वाचा – ‘पारू’ फेम अभिनेत्याचा मोठा निर्णय, मानधन थकबाकीनंतर मुलांना शाळेत पाठवणार नसल्याचा मुद्दा समोर; पोस्ट व्हायरल

‘मना’चे श्लोक’ हा चित्रपट १० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. याचे लेखन आणि दिग्दर्शन मृण्मयी देशपांडे यांनी केले असून निर्माते श्रेयश जाधव आणि संजय दावरा आहेत. चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब असे कलाकार आहेत. हा चित्रपट स्टारलाईट बॉक्स थिएटर्स आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Tags: Manache Shlokmanache shlok marathi moviemarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Nafisa Ali Sodhi cancer

बॉलिवूड अभिनेत्री पुन्हा एकदा कॅन्सरची शिकार, हेल्थ अपडेट शेअर करत म्हणाली, "केमोथेरपी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.