रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आई झाल्यानंतर कार्तिकी गायकवाडची पहिली पोस्ट, आनंद गगनात मावेना, कलाकारांकडूनही अभिनंदनाचा वर्षाव

Saurabh Moreby Saurabh More
मे 15, 2024 | 3:13 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
आई झाल्यानंतर कार्तिकी गायकवाडची पहिली पोस्ट, आनंद गगनात मावेना, कलाकारांकडूनही अभिनंदनाचा वर्षाव

आई झाल्यानंतर कार्तिकी गायकवाडची पहिली पोस्ट, आनंद गगनात मावेना, कलाकारांकडूनही अभिनंदनाचा वर्षाव

झी मराठीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प’ या कार्यक्रमाची लोकप्रियता ही सर्वश्रुत आहे. याच कार्यक्रमामुळे नावारुपाला आलेली गायिका म्हणून कार्तिकी गायकवाडला ओळखले जाते. या कार्यक्रमातील तिचं ‘घागर घेऊन’ ए गाणं चांगलंच व्हायरल झालं होतं. या कार्यक्रमाची विजेती गायिका कार्तिकी ही तिच्या आवाजाने कायमच चर्चेत असते. त्याचबरोबर ती सोशल मीडियावरही तितकीच चर्चेत असते. आपल्या आवाजाने कायमच चर्चेत राहणारी कार्तिकी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि या चर्चेचं कारण म्हणजे गायिका नुकतीच आई झाली आहे.

काल (१४ मे) रोजी कार्तिकीने सोशल मीडियाद्वारे आई झाल्याची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली. कार्तिकीला मुलगा झाला असून सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत तिने तिच्या लाडक्या चिमुकल्या राजकुमाराचे स्वागत केले आहे. “आम्ही आमच्या राजकुमाराचे स्वागत करत आहोत. हा एक नवीन सापडलेला खजिना आहे. आम्हाला आमचे नवीन प्रेम सापडले आहे. हा क्षण खरंच शब्दांत व्यक्त करता येणे शक्य नाही. कारण मूल असण्याची ही भावना छान असते” असं आनंद कार्तिकीने पोस्टमधून व्यक्त केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Kartiki Kalyanji Gaikwad – Pise (@kartiki_kalyanji_gaikwad9)

आणखी वाचा – नेत्राने कोंडून ठेवल्यानंतर नागाने येऊन रुपालीची केली सुटका, विरोचकाची शक्ती आणखी वाढणार, देवीआई मदत करणार का?

कार्तिकीने तिच्या आई झाल्याची बातमी शेअर करताच तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच तिला अनेक स्तरातून शुभेच्छाही येत आहेत. नुकतीच तिने एक पोस्ट शेअर केली असून या पोस्टखाली तिला तिच्या अनेक चाहत्यांसह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच गायिकेचे कौतुकही केले आहे. गायिका शमिका भिडे व शरयू दाते यांच्यासह शिवानी बावकर, गिरिजा प्रभू, प्रियंका केतकर, शंतनू मोघे यांसारख्या अनेक कलाकारांनीही तिला कमेंट्सद्वारे अभिनंदन असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – अधिपतीच्या जवळ जाण्याचा सरगम मॅडमचा प्रयत्न, अक्षराला नवऱ्याला गमावण्याची भीती, भूवनेश्वरी दोघांना एकमेकांपासून दूर करु शकेल का?

दरम्यान, ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’च्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या कार्तिकीचा मोठा चाहतावर्ग आहे. कार्तिकीने आपल्या सुरांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. ‘सारेगमप लिटल चॅम्प्स’मधील कार्तिकीचं ‘घागर घेऊन’ हे गाणं खूपच लोकप्रिय झालं होतं. कार्तिकी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. अशातच तिने शेअर केलेले हे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Tags: kartiki gaikwadKartiki Gaikwad Mother Newsmarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
dipika kakar on mother in law

दीपिका कक्कर सासूसाठी झाली भावूक, टीकाकारांना उत्तर देत म्हणाली, "कोणाच्याही आईबद्दल…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.